राज्यस्तरीय मराठी पाढे पाठांतर स्पर्धा नाव नोंदणीस मुदतवाढ

पुणे : मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेसाठी वाढता प्रतिसाद लक्षात घेता नोंदणीची दिनांक २० जुन २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सहभागी स्पर्धक ७ जुन २०२१ नंतर आपले व्हिडिओ अपलोड करू शकतील. मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि चे संचालक मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्याना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुरु असलेल्या नोंदणीस राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे .
मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी विकास संस्थामार्फत सह आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनांत सहभाग घेतला आहे. पाच वर्षे हा उपक्रम चालणार आहे. या स्पर्धेची नावनोंदणी १ मे २०२१ महाराष्ट्र दिनापासून ऑनलाईन सुरू झाली असून ‘अंकनाद ‘ या अॅपद्वारे नावनोंदणी ची सुविधा देण्यात आली आहे .

मंदार नामजोशी म्हणाले,’ पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल. अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून पाठ होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे पाठांतर स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन केले आहे.

जिल्हा पातळी व राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली जाईल. सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्याना पाढे पाठांतर स्पर्धा खुली राहील.विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून शिकत असला तरी स्पर्धा मराठी भाषेतूनच होईल. पाढे पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यासाठी आहे. विद्यार्थ्यानी आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे म्हणताना व्हिडीओ क्लिप ‘www.mahaaanknaad.com ‘ वेबसाईटवर पाठवू शकतील.

मागील वर्षी २०२o मध्ये स्पर्धेचे उदघाटन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.१७६० स्पर्धकांनी सहभाग घेतला. मंत्रालयात पारितोषिक वितरण झाले. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: