समीर चाैघुले यांना राम नगरकर कला गौरव पुरस्कार जाहीर

पुणेः-रंगभूमी, चित्रपट आणि रामनगरी या एकपात्री कार्यक्रमाच्या माध्यमातून जगभरातील तमाम मराठी रसिकांना खळखळून हसवणारे प्रसिद्ध अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राम नगरकर कला गौरव पुरस्कार-2021 यंदा गेली 28 वर्षे रंगभुमी आणि मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून कार्यरत असलेले प्रसिद्ध विनोदी कलाकार समीर चाैघुले यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती राम नगरकर कला अकादमीचे अध्यक्ष वंदन राम नगरकर, उपाध्यक्ष उदय राम नगरकर,सहसचिव मंदा नगरकर- हेंगडे, सचिव संध्या नगरकर- वाघमारे यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली आहे. 8 जून हा राम नगरकर यांचा स्मृतीदिन त्याचेच आैचित्य साधत ह्या पुरस्काराची घोषणा करण्यात येत असल्याचे वंदन राम नगरकर यांनी कळविले आहे. 

राम नगरकर यांची विनोदाची परंपरा पुढे नेणा-या कलाकाराला राम नगरकर कला अकादमीच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात. पुरस्काराचे स्वरुप 11 हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे आहे. राम नगरकर कला गौरव पुरस्काराने याआधी भाऊ कदम आणि डाॅ.निलेश साबळे यांना गाैरविण्यात आले आहे. 
विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यामुळे नगरकर यांचे नाव अनेक मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहचले. दादा कोंडके, यांच्यानंतर निळू फुले यांच्या बरोबर त्यांनी राजकारण गेले चुलीत हे वगनाट्यही खूप गाजले. एक डाव भुताचा, बायांनो नवरे सांभाळा, ह-या ना-या झिंदाबाद असे चित्रपटही राम नगरकर यांनी गाजवले. किस्से सांगणे ही त्यांची खासियत होती. स्वतःच्या जीवनशैलीचे खुसखुशीत वर्णन त्यांनी रामनगरी या त्यांच्या आत्मचरित्रात केले. अशा हरहुन्नरी कलाकाराची स्मृती सदैव तैवत राहवी म्हणुन राम नगरकर कला अकादमीच्यावतीने हे पुरस्कार दिले जातात. 


व्यवसायिक नाटके, इंग्रजी रंगभुमी, दूरचित्रवाणीवर मराठी हिंदी मालिका, चित्रपट, स्वतंत्र लेखन अशी चाैफेर मुशाफिरी आजवर समीर चाैगुले यांची झालेली आहे. श्री बाई समर्थ या नाटकाकरीता चाैगुले यांना राज्य शासनाच्या व्यवसायिक नाटक स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणुन रोप्य पदकांना गाैरविण्यात आले असून सर्वोत्कृष्ठ विनोदी अभिनेता, सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेता अशा विविध पुरस्कारांने आजवर गाैरविण्यात आले आहे. 
कोविड-19 चे नियम शिथील होताच पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे राम नगरकर कला अकादमीचे अध्यक्ष वंदन राम नगरकर यांनी कळविले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: