३०० हून अधिक महिलांना चारचाकी वाहनाचे प्रशिक्षण; धनंजय जाधव यांचा उपक्रम

पुणे: महिलांनी एक नवीन कौशल्य या स्तुत्य उपक्रमातून आत्मसात केल त्याच कौतुक मला वाटते. यातून उत्तम रोजगार देखील महिलांना मिळू शकतो. बोलतांना डॉ. निलम गोऱ्हे यांनी महिलांना सल्ला दिला की, धनंजय जाधव सारखे युवा शिवसैनिक सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतात अशा उमदा कार्यकर्ताच्या मागे आपल्याला उभे राहिले पाहिजे जेणेकरून प्रभाग स्तरावरील तुमचे काम व्यवस्थीत मार्गी लागू शकतील.

शिवसेनेचे पुणे, शिवाजी नगर विभागाचे समन्वयक शिवसैनिक धनंजय जाधव यांच्या उपक्रमातून तीनशेहून अधिक महिलांना चार चाकी वाहनाचे प्रशिक्षण मारुती ड्रायव्हिंग स्कूलच्या सहाय्याने यशस्वीरित्या देण्यात आले. त्यातील शंभर महिलांना आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या एतिहासिक दिवसाचे औचित्य साधुन लर्निंग लायसन चे वाटप महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, विधानसभा प्रमुख आनंद मंजाळकर, युवराज शिंगाडे, भुषण शिंदे, संजय गवळी, सुमीत काळेकर, शिवसेना महिला आघाडीच्या करुणा घाडगे, पौर्णीमा बहिरट, स्वाती सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनापासून या वाहन प्रशिक्षणाला सुरूवात झाली होती. महिला सक्षमीकरण करण्याकरिता पुणे शिवाजी नगर भागातील माता भगिनींसाठी विभाग समन्वयक धनंजय जाधव यांच्या वतीने हा उपक्रम अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिला होता. त्यातीलच शंभर महिलांना पहिल्या टप्प्यात आज लर्निंग लायसन्स देण्यात आले. लाभार्थी महिलांनी आयोजकांचे आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: