ग्रामपंचायत कार्यालयावर भगवा लावणे हे ध्वजसंहितेचे उल्लंघन -अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

मुंबई – राज्याच्या ग्रमाविकास विभागाने पत्रक काढून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ६ जून रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याची सूचना केली आहे. यात ग्रामपंचायत कार्यालयावर भगवा ध्वज लावण्याचे आदेश दिले आहेत. ही बाब ध्वजसंहितेचे उल्लंघन करणारे आहे, अशी तक्रार अ‍ॅड. जयश्री पाटील आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव आणि सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

ग्रामविकास विभागाच्या या पत्रामध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्याची सूचना केली आहे. यात कार्यालयावर भगवा ध्वज उभारावा, याचबरोबर सुवर्ण कलश बांधावा, पुष्पहार आणि त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहून त्यावर अक्षदा टाकाव्यात हळद कुंकू आणि ध्वनिक्षेपक वापरून ध्वजारोहण करावे असे सांगितले आहे. याचबरोबर राष्ट्रगती व महाराष्ट्रगीत गाऊन सांगता करावी असे सांगण्यात आले आहे. मात्र ही बाब घटनाविरोधी तसेच, ध्वजसंहिता भारतीय संविधानातील ३६२ व्या कलमानुसार गैर आहे, असे या पत्रात म्हटले आहे. तरी ६ जून रोजी शासकीय कार्यालयातील हे ध्वजारोहण रोखावे, अशी मागणीही या पत्रात केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: