कोरोना – राज्यात शनिवारी १३ हजार ६५९ नवीन रुग्ण

मुंबई – राज्यात  शनिवारी १३ हजार ६५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५८ लाख १९ हजार २२४ झाली आहे. राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्णांना बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोना मुक्त झाले आहेत.

राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ८८ हजार ०२७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६२,७१,४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,१९,२२४ (१६.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोरोनाबाधित नव्या रूग्णांमध्ये घट झाली असली तरी मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे. राज्यात आज ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

पुणेशहर अपडेट 

  • दिवसभरात ३८० पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ६४१ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत २८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १०.
  • ७०९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७१९५७.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४५६३.
  • एकूण मृत्यू -८३७९.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५९०१५.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६९०९.

Leave a Reply

%d bloggers like this: