‘जैन तत्वज्ञान ई-संस्कार शिबीर’ला आजपासून सुरूवात; एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांची शिबिरासाठी नोंदणी

पुणे – समाजात आज अनेक लोक आपल्या अधिकारासाठी/आरक्षणासाठी झगडत असतात किंतु ग्रंथाधिराज समयसारातील जीवाजीव-अधीकार स्पष्ट करतो की आपला अधिकार अन्य कोणीही घेऊच शकत नाही आणि आपल्याला देखील दुसऱ्या कुणाचाही अधिकार घेता येत नाही. प्रत्येक जीव आणि अजिव हे आपआपल्या अधिकारानेच राहतात. पर पदार्थांपासून भिन्न समयभूत आत्मा म्हणजे समयसार. या शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मतत्त्वाची वास्तविक ओळख आपल्या स्वानुभवातून आचार्य कुंदकु़ंदानी या परमागम समयसार ग्रंथात केली आहे. पंडित डॉ. संजीवजी गोधा यांनी संपुर्ण समयसार ग्रंथाचा सार मार्मिक आणि सोप्या शब्दात आजच्या उद्धाटन सभेत व्यक्त केला.

समयसार-कहान शताब्दी महोत्सव वर्षान्तर्गत संपूर्ण भारतात धर्मप्रभावणेच्या हेतूने ‘जैन तत्वज्ञान संस्कार शिबीर आयोजित केले त्याच्या उद्धाटन सभे प्रसंगी आंतराष्ट्रीय ख्याती प्राप्त विद्वान पंडित डॉ. संजीवजी गोधा बोलत होते. या वेळी अनंतभाई शेठ मुंबई, ब्रजलालजी हथाया (सभा अध्यक्ष), विनूभाई शाह(स्वागताध्यक्ष), विनोदजी निरखे(मलकापूर), कु. सुमी जैन सुपुत्री सुनिल सराफ(शिबिर उद्घाटनकर्ता), पारसजी पारेख (आमंत्रनकर्ता), सुकुमार चौगुले, विपीनजी शास्त्री(ध्वजारोहण कर्ता), कु. गाथा एवं चि. कलश राठी(मंगलाचरण), संजीवकुमार गोधा, जयपूर (मंगल उद्बोधन), पं.अनिल आलमाण व पं. प्रसन्न शेठे आदी मान्यवर व साधर्मी उपस्थितीत होते.

शिबिरासाठी काल रात्री पर्यंत एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. संपूर्ण शिबीराचे आयोजन परमागम प्रभावणा ट्रस्ट पुणे व सर्वोदय स्वाध्याय ट्रस्ट, हेरले यांच्या द्वारे करण्यात आले आहे. हे शिबिर आज रविवार दिनांक ६ जुन पासुन शनिवार दि. १२ जुन २०२१ पर्यंत असणार. उद्घाटन सभेचे सुत्र संचालन पं.जितेंद्र राठी पुणे यांनी केले तर आभार पं. प्रसन्न शेठे, सांगली यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: