Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

PUNE – सोमवारपासून शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार

पुणे – सोमवारपासून पुणे शहरासाठी राज्य सरकारच्या तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार आता शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत सुरू असणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने याच वेळेत सुरू राहणार आहे. शहरातील हॉटेलसह, खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील. तर शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने सुरू राहणार आहेत. सायंकाळी पाचपर्यंत जमाबंदी तर सायंकाळी 5 नंतर संचारबंदी असणार आहे.

पीएमपीची बस सेवा 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असून सांस्कृतीक तसेच सामाजिक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. मात्र, या नियमावलीत नाटयगृहे तसेच चित्रपटगृहे बंदच ठेवण्यात येणार आहेत.

तर सलून, स्पा आणि ब्यूटीपार्लरसह बंद असलेली खेळाची मैदाने आणि उद्यानांचे दरवाजे पुन्हा उघडणार आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यानुसार, येत्या सोमवार ( दि. 7 जून) पासून या सुधारीत नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या शिवाय, बॅंका तसेच वित्तीय संस्थाचे कामकाज आठवडभर नियमित वेळेत सुरू असणार आहे.

पुण्यात ‘हे’ राहणार सुरू

  • हॉटेल, रेस्टोरंट ( सोमवार ते शुक्रवार ) दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने
  • हॉटेल मधून शनिवार- रविवार केवळ पार्सल सेवा
  • लोकल – फक्त अत्यावश्‍यक सेवा कर्मचारी
  • सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे – पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत
  • खासगी कार्यालये ( सोमवार ते शनिवार ) – दुपारी 4 पर्यंत ( 50 टक्के कर्मचारी क्षमता)
  • क्रीडा – सकाळी 5 ते 9 , सायंकाळी 6 ते 9 रिकाम्या जागा, मैदानात
  • चित्रीकरण – बायोबाल , सायंकाळी 5 पर्यंत
  • सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम -50 जणांच्या उपस्थितीत, सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत
  • लग्न – 50 जणांच्या उपस्थितीत
  • अंत्यविधी – 20 जणांच्या उपस्थितीत
  • शासकीय बैठका, सहकार बैठका – सभा – 50 टक्के उपस्थिती
  • बांधकाम – दुपारी 4 पर्यंत मुभा
  • शेती विषयक कामे – आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत
  • शहरात सायंकाळी पाचनंतर संचारबंदी
  • जिम, सलून, ब्युटी पार्लर – 50 टक्के क्षमतेने , पूर्व नियोजित वेळ घेऊन
  • सार्वजनिक वाहतूक सेवा -50 टक्के क्षमतेने केवळ बसून
  • ई कॉमर्स – नियमित वेळेत
  • मला वाहतूक – नियमित वेळेत
  • अत्यावश्‍यक वस्तू उत्पादन कंपन्या, आयटी, डेटा सेंटर, – नियमित वेळेत

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading