प्रत्येक महाविद्यालय साजरा होणार शिव स्वराज्य दिन – उदय सामंत


पुणे – महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात शिव स्वराज दिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज केली आहे. दरम्यान शिवज्योत रॅली देखील  प्रत्येक महाविद्यालयातून निघणार आहे .
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या पुण्यातील सी ओ पी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून याचा शुभारंभ करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाल आहे.
कोरोना नियमांचे पालन करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून शिव स्वराज दिन साजरा केला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पुढच्या वर्षीपासून महाविद्यालयातून शिवज्योत रॅली काढली जाणार असं त्यांनी जाहीर केलं.
उदय सामंत यांनी केलेल्या घोषणांमुळे शिवप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. पुण्यातील पत्रकार परिषदेत यांनी त्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात आता शिवस्वराज दिन साजरा केला जाणार आहे जाणार आहे असे त्यांनी जाहीर केले.

Leave a Reply

%d bloggers like this: