Saturday, September 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

काँग्रेस मध्ये असतांना राणेंची ‘मोदीं वरील’ टिका ही त्यांचे लायकी प्रमाणे होती का..? – गोपाळदादा तिवारी

पुणे दि ४ – ज्या नेत्यांचे ‘राजकीय विचार’ स्थिर नाहीत, ज्यांनी सतत संधी-साधूपणे सरड्या सारखी भुमिका बदलली, अशा “भाजपवासी झालेल्या” नेत्याने आपली ‘वैचारीक उंची’ ओळखूनच बोलावे..! ‘शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राला’ संतांचे संस्कार व मा शाहू महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फूले, डॅा आंबेडकर आदींचे संस्कार लाभलेत..! छ. श्री संभाजी महाराज कोणत्याही पक्षात असेनात, अखेर ते शिवछत्रपतींचे वंशज आहेत याचे भान ठेवावे..! महाराष्ट्राच्या ‘संकेत, परंपरा व संस्कारांचा’ अपमान कोणत्याही नेत्यांविषयी’ गैर ऊदगार काढून करू नये. आदरणीय संभाजीराजे, पवार साहेब व नाना पटोले यांचे विषयी पुण्याच्या ‘पत्रकार परीषदेत’ राजकीय टिके व्यकिरीक्त गैर ऊदगार काढले बद्दल त्याचा निषेध करीत आहोत असे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे..!


“राष्ट्र व महाराष्ट्र” ऊभारणीत भारतिय काँग्रेस’चे भरीव योगदान आहे..! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाची ऊज्वल परंपरा आहे याची ऊचीत जाण ठेवावी..! वास्तविक पत्रकारांनी “जीडीपी, केंद्राचे लसीकरण धोरण, महागाई, इ वर विचारलेल्या प्रश्नांविषयी त्यांनी मा नाना पटोलें व राज्य सरकार वर खापर फोडणे हे हास्यास्पदच नाही तर अज्ञान दर्शवणारे आहे…! नारायण राणे (काँग्रेस मघ्ये असतांना) तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस व पंतप्रधान मोदीं वर टोकाची टिका केली, त्या वेळी आपली लायकी वा कुवत होती का..(?) असा सवाल ही गोपाळदादा  तिवारी यांनी केला…!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ‘देशांत द्वितीय क्रमांकावर’ असलेल्या “राष्ट्रीय पक्षाचे” अध्यक्ष आहेत.. त्यांच्या विषयी गाव गुंडाची भाषा करू नये, हे काँग्रेसजनांतर्फे निर्वांणीचे सांगणे आहे..!
राजकीय पोटशूळ, महाविकास आधाडी बद्दलचा कमालीचा द्वेष, व सत्तेची हाव या गोष्टी आपणास सभ्यता, संस्कार व नैतिकतेचे संकेत पायदळी तोडण्यास भाग पाडत आहेत काय(?) असा सवाल राज्यातील जागरूक जनता आपल्याला विचारल्या शिवाय रहाणार नाही.. असे ही गोपाळदादा तिवारी यांनी विचारले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading