कोरोना – राज्यात शनिवारी २० हजार २९५ नवीन रुग्ण; ४४३ जणांचा मृत्यू
मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत २० हजार २९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४४३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५७ लाख १३ हजार २१५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९४ हजार ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात ३१ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५३ लाख ३९ हजार ८३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.४६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के एवढा आहे.
आज नोंद झालेल्या एकूण ४४३ मृत्यूंपैकी २८८ मृत्यू मागील ४८ तासातील तर १५५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. सध्या राज्यात २ लाख ७६ हजार ५७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ४६ लाख ८ हजार ९८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख १३ हजार २१५ (१६.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २० लाख ५३ हजार ३२९ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर १४ हजार ९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
पुणे शहर अपडेट
- दिवसभरात ५५९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात १०२३ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ३८ रुग्णांचा मृत्यू. त्यातील ११ मृत्यू पुण्याबाहेरील.
- ९६३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६९२६१.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७०४४.
- एकूण मृत्यू -८२०४.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५४०१३. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७९६६.
