Friday, October 23, 2026
Latest NewsPUNE

कोविन ॲपमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करा शहर भाजप तर्फे गृहमंत्र्यांकडे मागणी  

पुणे – कोविन ॲपमध्ये सायबर तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या गैरप्रकाराची चौकशी करावी तसेच या ॲपमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी भाजप शहर चिटणीस सुनील माने यांनी निवेदनाद्वारे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आज केली. विधानभवन येथे भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

कोरोना संक्रमणापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवत आहे. नागरिकांचा ही याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच लसीकरण केंद्रावर होणारी गडबड टाळण्यासाठी केंद्र सरकारने कोविन ॲप मार्फत नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. लसींच्या उपलबद्धतेनुसार या ॲपवर लोकांना नोंदणी करून लस घेता येते. मात्र काही सायबर गैरप्रकार करणाऱ्या व्यक्ती व कंपन्या या ॲपमध्ये फेरबदल करून स्लॉट बुक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या गैरप्रकारामुळे लसीकरणास पात्र व्यक्तींना ॲपवर नोंदणी करणे शक्य होत नाही. यामुळे त्यांचे लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही. यामुळे बऱ्याचवेळा लसीकरण केंद्रावर वादावादीचे प्रकार घडून गोंधळ निर्माण होतो. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

या प्रकारे गैरप्रकार करून लसीकरण कार्यक्रमात अडथळे आणणे व या मार्गाने आर्थिक गैरप्रकार होत आहेत का याची चौकशी करण्याचे आदेश राज्यातील पोलिस यंत्रणा, सायबर विभाग तसेच राज्यातील प्रत्येक शहराच्या पोलिस प्रमुखांना द्यावेत अशी विनंती गृहमंत्र्यांकडे सुनील माने यांनी केली. गृहमंत्र्यांनी ही याबाबत स्कारात्मक प्रतिसाद देत याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading