Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी लसीकरणा संदर्भात घेतली पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट

पुणे – शासनाच्या आरोग्य विभागाच्या नव्याने आलेल्या आदेशानुसार दिनांक १५ मेपासून कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी हा ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा करण्यात आला आहे.

लसीकरणाच्या ८४ दिवसांच्या नियमावली मुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून , अनेक ज्येष्ठ नागरिक हवालदिल झाले आहेत. १ मार्च २०२१ ला देशपातळीवर लसीकरण सुरू करण्यात आले, ज्यांचा पहिला डोस झाला अश्या कोणलाही ८४ दिवस पूर्ण होत नाहीत व सध्याच्या परिस्थितीत लसीकरण हेच एकमेव संरक्षक कवच आहे. अश्यात नागरिक हैराण झाले असून प्रशासनाने त्वरित निर्णय घेण्यात यावा, असे निवेदन नगरसेविका प्रा ज्योत्स्ना एकबोटे यांनी आयुक्तांना प्रत्यक्षात भेट घेऊन लक्षात आणून दिले व त्याच प्रमाणे यामागणी चा ईमेल देखील पाठविण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading