उमेश गोयल ट्रस्ट इंडिया ची गरजूना अन्नाची पाकिटे मोफत देण्याचा उपक्रम 

पुणे, दि. ४ –  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून अनेक राज्यात लॉक डाउन लावण्यात आला. सर्वचजण आपापल्या शक्तीनिशी या महामारीशी लढा देण्यात सहभागी होत आहेत. या परिस्थितीची गरज ओळखून श्री अनुज गोयल, व्यवस्थापकीय संचालक, गोयल गंगा डेव्हलपमेंट्स यांनी उमेश गोयल ट्रस्ट इंडिया च्या माध्यमातून शहरातील गरजूना अन्नाची पाकिटे मोफत देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये दर्जेदार अन्नाची १०० पाकिटे गरजू व्यक्ती, हॉस्पिटल, कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातलग यांना रोज दिली जात आहेत.  यातून त्याना सध्याच्या कठीण परिस्थितीत काही दिलासा मिळेल. या उपक्रमात वर्षभरात २०,००० अन्न पाकिटे गरजूंपर्यंत पोचवली जाणार आहेत.

गोयल गंगा डेव्हलपमेंट्सचे  व्यवस्थापकीय संचालक अनुज गोयल म्हणाले,  “आपला देश सध्या अभूतपूर्व संकटात आहे. या स्थितीत सर्वांचेच पूर्ण सहकार्य गरजेचे आहे आणि म्हणून आम्ही गरजूना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.  झळ पोचलेल्या व्यक्तींना या आपत्तीशी सामना करण्याची ताकद मिळावी यासाठी प्रयत्न करणे ही आम्हाला आमची नैतिक जबाबदारी वाटते. सर्वजण सुरक्षित असावेत आणि त्यांचे आरोग्य अबाधित असावे ही इच्छा आम्ही व्यक्त करीत आहोत. परिस्थिती लवकर पूर्ववत होईल अशी आम्हाला आशा आहे. “

Leave a Reply

%d bloggers like this: