‘सूर्यदत्ता’च्या विद्यार्थ्यांचे स्टार्टअप-इनोव्हेशनमध्ये उत्तुंग यश

पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित सूर्यदत्ता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या (एससीएमआयआरटी) विद्यार्थ्यांनी वर्षभरात (शैक्षणिक वर्ष २०२०-२१) स्टार्टअप आणि इनोव्हेशनमध्ये उत्तुंग यश मिळवले आहे. बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मिहीर गणेशवाडे (कप बिन मॉडेल), बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या यज्ञेश अभ्यंकर (थ्रीडी प्रिंटर बाय असेम्बलिंग पार्ट), बीबीए आयबीची साक्षी बट्टूवार (केशवा ऑईल्स), बीबीए आयबीची गायत्री महाजन (मैत्री टी-शर्ट प्रिंटिंग), बीबीए आयबीची करीना मानेकर (ज्वेलेक) यांनी आपले स्वतःचे स्टार्टअप सुरु केले आहेत.

‘एससीएमआयआरटी’ महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त, ‘नॅक’ प्रमाणित या महाविद्यालयात बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, इंटरनॅशनल बिझनेस, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, अनिमेशन, कॉमर्समध्ये पदवी आणि कॉमर्स व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण दिले जाते. हे स्टार्टअप प्रत्यक्षात आणण्यात ‘एससीएमआयआरटी’ सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड इंटरप्रेन्युअरशिपची (सीआयआयई) मदत झाली. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनानंद केले.

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केलेल्या या कामगिरीचा आनंद झाला असून, त्याचे श्रेय विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना व मार्गदर्शकांना द्यायला हवे. उमद्या तरुणांकडून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे हे यशस्वी पाऊल पडले आहे. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. पर्यावरण संवर्धन, हर्बल हेरिटेज, भारतीय परंपरा आणि कल्पनाशक्ती अशा संकल्पनांवर हे स्टार्टअप केले आहेत, हे कौतुकास्पद आहे. ‘एससीएमआयआरटी’ सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड इंटरप्रेन्युअरशिपमुळे (सीआयआयई) संस्थेत व्यावसायिकतेला पूरक वातावरण तयार होत आहे. त्यातून अनेक नवनिर्मिती व स्टार्टअप्स उदयाला येत आहेत.”

‘सीआयआयई’ची स्थापना मार्च २०१९ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने झाली. येथे इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि आंत्रप्रेन्युअरशिप या गोष्टींवर भर दिला जातो. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, संसाधने, प्रशिक्षण, संशोधन येथे उपलब्ध केले जाते. समाजातील विविध समस्या, क्षेत्रे शोधून त्यानुसार स्टार्टअप सुरु करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते, असेही डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.

Leave a Reply

%d bloggers like this: