Big Breaking – IPL 2021 स्पर्धेतील सर्व सामने रद्द

नवी दिल्ली, दि. 4 – बायोबबल चे चक्रव्यूह भेदून कोरोनाचा शिरकाव हा इंडियन प्रिमिअर लिगमध्ये सहभागी टीम्सच्या आणखी काही खेळाडूंना झाल्याने संपुर्ण IPL चा सीझन रद्द झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यामुळे भारतातील यंदाचा आयपीएलचा हंगाम आता संपुष्टात आला आहे.

कोलकात्याचा वृद्धिमान साहा आणि अमित मिश्रा या खेळाडूनांही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आज समोर आले. त्यापाठोपाठच आयपीएलचे भारतातील सर्व सामने रद्द झाल्याची माहिती आयएनआय या वृत्त संस्थेने जाहीर केली आहे. याआधीच आयपीएलच्या टीममध्ये वरूण चक्रवर्ती, संदीप वॉरियर यांना कोरोनाची लाग झाल्याची बातमी समोर आली होती. याआधीच सोमवारी चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स दरम्यानचा सामनाही काही खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आल्याने रद्द झाला होता. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुल्का यांनी ही माहिती आयएनआय या वृत्तसंस्थेला देताना ही माहिती जाहीर केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: