कोरोना – राज्यात रविवारी नवीन रुग्णांची संख्या 60 हजारहुन कमी
मुंबई – राज्यात आज कोरोनाबाधितांचा आकडा साठ हजारांच्या खाली गेला आहे. गेल्या २४ तासांत ५६ हजार ६४७ रुग्णांची वाढ झाली आहे. तर, ५१ हजार ३५६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर 669 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण बाधितांचा आकडा ४७ लाख २२ हजार ४०१ पोहोचला आहे. तर, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३९ लाख ८१ हजार ६५८ झाली आहे. सध्या राज्यात ६ लाख ६८ हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.31% झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,76,52,758 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 47,22,401 (17.08 टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39,96,946 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 27,735 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण सुरु
राज्यात 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज 26 जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण 132 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले आहे. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला 26 जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली. उर्वरीत जिल्ह्यांमध्ये उद्या 2 मे पासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे 3 लाख डोसेस खरेदी केले आहेत. वयोगटासाठी आज सर्वाधिक लसीकरण पुण्यात झालं. पुण्यात 19 केंद्रांवर 1316 जणांचं लसीकरण झालं. तर मुंबईतील पाच केंद्रांवर 1004 जणांचं लसीकरण झालं.
पुणे शहर अपडेट्स
- दिवसभरात ४०४४ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ४६५६ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ९३ रुग्णांचा मृत्यू. २७ रूग्ण पुण्याबाहेरील.
- १४०१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४२७६३१.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४२२२९.
- एकूण मृत्यू -६९३०.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३७८४७२. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १६६१०.
