प. बंगालमध्ये तृणमूलची बाजी; मात्र ममता दीदी नंदीग्राम पराभूत

कोलकाता, दि . 2 – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये  तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यानी आपला गड राखत भाजपला  अस्मान दाखवले . पण, नंदीग्राम मतदारसंघातून  ममतादीदींना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीला ममतादीदी जिंकल्या असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण,  भाजपचे उमेदवार सुवेंद्र अधिकारी विजयी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. तृणमूल काँग्रेसने एकहाती सत्ता राखत 218 जागांवर आघाडीवर आहे. . 148 जागांवर तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात भाजपकडून सुवेंद्र अधिकारी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासून अधिकारी हे आघाडीवर होते. मात्र, संध्याकाळी अचानक चित्र पालटले आणि ममतादीदींनी आघाडी घेतली. 1200 मतांनी ममतादीदींना विजयी घोषित करण्यात आले होते. ममतादीदी विजयी झाल्यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते.

पण सुवेंद्र अधिकारी अंतिम निकालाअंती चित्रच पालटले. सुवेंद्र अधिकारी हे 1622 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.

ममतादीदींच्या पराभवामुळे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. खुद्द ममता बॅनर्जी यांनी पराभव स्वीकारला आहे. ममता बॅनर्जींना पुन्हा मुख्यमंत्री होता येईल, पण पुढच्या सहा महिन्यात त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल, त्यासाठी टीएमसीच्या एका आमदाराला राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण बंगालमध्ये विधान परिषद नाही. त्यामुळे विधान परिषदेतून ममतादीदींना आमदार होता येणार नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: