fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

पुणे शहर काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा

 पुणे, दि. 1 – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन काँग्रेस भवन येथे साजरा करण्यात आला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली व मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने पुढाकार घेऊन आंदोलने केली. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना ६ फेब्रुवारी १९५६ रोजी कै. केशवरावजी जेधे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात स्थापना झाली. या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनास एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, श्रीपाद अमृत डांगे, पी. के. अत्रे, भाई उध्दवराव पाटील व अनेक नेत्यांनी भाग घेतला. या आंदोलनात १०५ जणांना आपला जीव गमवावा लागला व ते हुतात्मे झाले. ४ मे १८८६ रोजी शिकागोमध्ये कामगारांनी संप केला. त्या कामगारांची प्रमुख मागणी अशी होती की, कामगारांना त्यांच्या २४ तासांपैकी ८ तास काम, ८ तास विश्रांती व ८ तास करमवणूकीसाठी वेळ द्यावा. त्यांच्या या संपावर पोलीसांनी गोळीबार केला व चार कामगार मृत्यूमुखी पडले. जगभरात १ मे आंततरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.’’

यावेळी बाळासाहेब शिवरकर, कमल व्‍यवहारे, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, सुजाता शेट्टी, प्रकाश पवार, बाळासाहेब अमराळे, यासीन शेख, भारत सुराणा, सौरभ अमराळे, मनोहर गाडेकर व इतर काँग्रेसजण उपस्थित होते.     

 याप्रसंगी कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading