‘लीगल डेटाबेस सर्चिंग’ विषयावरील प्रशिक्षणास प्रतिसाद
पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ए.के.के.न्यू लॉ ऍकेडमी तर्फे ईस्टर्न बुक कंपनी प्रा.लि यांच्या सहकार्याने आयोजित ‘लीगल डेटाबेस सर्चिंग’ विषयावरील ऑनलाईन प्रशिक्षणास मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाला.चेतन गिल यांनी मार्गदर्शन केले. ए.के.के.लॉ ऍकेडमी चे प्राचार्य डॉ रशीद शेख हे अध्यक्षस्थानी होते. ग्रंथपाल डॉ इंतेखाब आलम सिद्दीकी यांनी संयोजन केले. सुमारे शंभर विद्यार्थी ,प्राध्यापकांनी भाग घेतला .