माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई, दि. 28 – काँग्रेसचे माजी खासदार व राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडिल एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे बुधवारी निधन झाले आहे.
एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासू त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
एकनाथ गायकवाड हे दक्षिण मध्य मुंबईतून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. ते राज्य मंत्रीमंडळात देखील मंत्री होते. त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षपदही भूषविले आहे.