Thursday, September 3, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

रश्मी शुक्लांच्या नावे खंडणी मागितल्याची तक्रार खोटी आणि बनावट – निवृत्त पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ

पुणे : तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावे खंडणी / पैसे मागितल्याची माझ्याविरुद्धची तक्रार खोटी असून या संदर्भात शासन आणि माध्यमांनी माझी बाजू ऐकून न्याय द्यावा,या प्रकरणी षड्यंत्र करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसहित रॅकेट मधील सर्वांवर तातडीने कारवाई करावी ‘अशी मागणी निवृत्त पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत केली.

याच आशयाचे निवेदन त्यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना पाठवले आहे

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे २८ एप्रिल रोजी दुपारी ही पत्रकार परिषद झाली.यावेळी धनंजय धुमाळ यांच्या समवेत त्यांचे वकील एड.रमेश जाधव उपस्थित होते.

धनंजय धुमाळ म्हणाले,’तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावाने संदीप जाधव(रा.वीरभद्र सोसायटी ,बाणेर ,पुणे ) यांच्याकडून २५ लाख मागितल्याच्या खोट्या आरोपाखाली माझ्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती आणि निलंबन करण्यात आले होते या प्रकरणातील ऑडियो,व्हिडीओ रेकोर्डिंग सारखे पुरावे बनावट आणि फेरफार केलेले होते मात्र मूळ रेकोर्डिंग ज्या स्पाय कॅमेरा ,इलेक्ट्रोनिक साधनांचा वापर करून केले होते ,तो मूळ पुरावा प्राथमिक चौकशी अधिकारी यांनी न मिळवता बनावट रेकॉर्डिंगच्या आधारावर चौकशी आणि कारवाई करण्यात आली. (सदरचे रेकॉर्डिंग संदीप जाधव यांनी दिनांक 20/07/2016 रोजी केले ते 02/08/2016 रोजी पर्यंत स्वताच्या ताब्यात ठेवून त्यामध्ये आवश्यक ते फेरबदल करून त्यानंतर त्याच्या अनेक बनावट रेकॉर्डिंग केलेल्या सीडीज प्रसारमाध्यमात व पोलीस आयुक्त यांना दिल्या होत्या)
त्याच बनावट सीडीज व बनावट तक्रारीच्या आधारे कोणत्याही प्रकारची सत्यता पडताळून न पाहता सध्या पुन्हा बातम्या प्रसारित करण्यात आल्या.त्यामुळे माझी,कुटुंबियांची, महाराष्ट्र पोलीस दलाची व पर्यायाने महाराष्ट्र शासनाची बदनामी झाली. माझी अपिलीय सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावा यासाठीचा पत्रव्यवहार हा
कोविड साथीमुळे वेळेत पूर्ण न झाल्याने नाईलाजाने मला स्वतःलाच प्रसार माध्यमांद्वारे स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.

माझ्या विरुद्धचा बनावट तक्रारीअर्ज व बनावट सीडीज हे पुरावे पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांनीच तयार करून संदीप जाधव यांना दिले आहेत से खात्रीशीर समजले असल्याचे धनंजय धुमाळ यांनी सांगितले .

बाणेर,बालेवाडीतील
ज्या सर्व सामान्य लोकांच्या जमीनीवर काही पोलिसांच्या मदतीने संदीप जाधव, हेमंत गांधी आणि साथीदारांनी मारलेले बेकायदेशीर ताबे याबाबत केलेल्या तक्रारी बाबतीत संबंधित
पोलिस स्टेशन कडून योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्याने त्यांना आजही न्याय मिळालेला नाही .

पोलिसातील रक्षकच बनत आहेत भक्षक :

प्रत्यक्षात मी शिशिर कोशे,यांच्या जमीनीवर संदीप जाधव व हेमंत गांधी यांनी पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर ताबा मारल्याची आलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी करीत होतो.
संजय मुथा याच्या कागदपत्रांचा वापर करून 30 वर्षा पुर्वी टाटा मोटर्स कंपनीच्या
लोकांनी घेतलेल्या जमिनीवर ,प्लॉटवर संदीप जाधव ,हेमंत गांधी यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने
जमिनींचा ताबा बेकायदेशीर रित्या घेतला होता. त्यातील एक प्लॉट हा तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी आपल्या पत्नीच्या नावावर संदीप जाधव आणि हेमंत गांधी यांच्या कडून घेतला .त्या जमिनीची सरकारी किमत 90 लाख तर बाजारभावा प्रमाणे किमत ४ ते ५ कोटी रुपये होती,याचीही चौकशी करावी .
शिशिर कोसे याच्या
तक्रारीनांतर
पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार संदीप जाधव ,हेमंत गांधी यांची चौकशी करीत होतो.यावेळी २०१६ साली मी पुणे शहर गुन्हे शाखा (प्रॉपर्टी सेल ) येथे कार्यरत होतो . त्यामुळे आकसाने चौकशी दरम्यान झालेल्या चर्चेचे संदीप जाधव यांनी बनावट रेकॉर्डिंग चे पुरावे सादर करून माझ्याविरुद्ध २५ लाख मागितल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती. यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील पवार,अरुण सावंत आणि सुरेश मिरगे यांच्या सहभागाचीदेखील चौकशी व्हावी,अशी मागणी धनंजय धुमाळ यांनी केली आहे.

संदीप जाधवच्या जमिनींचे पोलीस दलात कोण कोण लाभार्थी आहेत ,हे शोधून काढावे ,अशी मागणीही त्यांनी केली आहे .

संदीप जाधव आणि हेमंत गांधी हे बाणेर भागात ज्यांच्याकडे जमिनीचे सात बारे आहेत पण जमिनीचा ठाव ठिकाणा माहित नाही अशां लोकांची माहिती घेऊन संगनमताने कवडीमोलाने विकत घेत असत व त्या आधारे सर्वसामान्यांच्या प्लॉटवर ताबा मारत असत. त्यांच्या विरोधात चतुःशृंगी पोलीस स्थानकात तक्रारी घेतल्या जात नव्हत्या. माझ्याकडे आलेल्या तक्रारी आधारे मी चौकशी सुरु केल्यावर धास्तावलेल्या संदीप जाधव यांनी मीच पोलीस आयुक्तांच्या नावाने २५ लाख रुपये मागत असल्याचा बनावट रेकॉर्डिंग पुरावा तयार केला. अजूनही मूळ पुरावा त्यांनी पोलिसांना सादर केलेला नाही. बनावट पुराव्याआधारेच अजून कामकाज चालवले जात आहे . या तथाकथित पुराव्याची छाननी केल्यास सर्व कटाची सत्यता उजेडात येईल. माझ्याविरुद्ध संदीप जाधव यांनी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केल्यावर खात्याने लावलेला सापळा संदीप जाधव यांची तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झाल्याने पुढील कारवाई झाली नाही .

.संदीप जाधव यांनी यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून पुणे पोलीस दलावर दबाव निर्माण केला आहे . याकामी पोलीस दलामधील आजी माजी पोलीस अधिकारी ,कर्मचारी त्यांना मदत करतात व याच गोष्टी बाहेर येतील म्हणून पोलीस अधिकारी ,कर्मचारी यांना खोट्या व बनावट पुराव्याच्या आधारे संदीप जाधव यांना तक्रार करण्यास मदत केली आहे .

जीवितास धोका असल्याची कल्पना पोलीस आयुक्तांना दिली

मी पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त पुणे यांना महिन्याभरापूर्वी भेटून आपल्याविरुद्ध झालेल्या अन्यायाची माहिती दिली होती,कारवाईची मागणी केली होती तसेच मला खोट्या गुन्ह्यात गोवणाऱ्या संदीप जाधव आणि इतरांकडून जीवितास धोका असल्याची कल्पना दिली होती,अशी माहिती धनंजय धुमाळ यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले,’हे षड्यंत्र रचणाऱ्या संदीप जाधव,पोलीस दलातील अधिकारी यांनी पदाचा दुरुपयोग करून माझ्यावर कारवाई केली याबद्दल त्यांची चौकशी करून मला दोषमुक्त करावे म्हणजे खोट्या कारवाईपायी भविष्यात माझ्यासारखा कोणाचा बळी जाणार नाही.माझ्यावरील कारवाई विरोधात मी अपील केले असून त्यावर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे निवेदन पाठवले आहे.

माध्यमे आणि सोशल मीडियावरील बदनामी थांबवा

सध्याच्या परिस्थितीत रश्मी शुक्ला यांच्या बाबत माध्यमात आणि सोशल मीडियावर चर्चा करताना विनाकारण आणि विनापुरावा या २५ लाखाच्या प्रकरणाचा उल्लेख माझ्या नावानिशी गणवेशातील फोटो दाखवून पुन्हा पुन्हा होत असल्याने माझी,कुटुंबीयांची आणि पोलीस दलाची बदनामी होत आहे .केली जात आहे . सत्यते बाबत कोणत्याही प्रकारची खात्री न करता स्वताच्या मर्जीनुसार बनावट व खोट्या पुराव्याच्या आधारे सोशल मिडिया ,न्यूज चानेल वर माहिती प्रसिद्ध केली जात आहे . असा उल्लेख करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणीही धनंजय धुमाळ यांनी केली आहे.

सोशल मीडिया वर अनिल देशमुख फॅन क्लब ,माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे,माजी आमदार हरिभाऊ राठोड,एबीपी माझा वाहिनीचे बातमीदार मंदार गोंजारी,टीव्ही ९ चे बातमीदार हेमंत बिर्जे तसेच इतर अनेकांनी माझी बदनामी केली असून ,करीत आहेत .या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी,असे धुमाळ यांनी म्हटले आहे . अशी तक्रार पुणे पोलीस आयुक्तांना दिल्याचे त्यांनी सांगितले .

तक्रारदार संदीप जाधव हे पोलीस अधिकारी ,कर्मचारी यांच्या संपर्कात येण्यापूर्वी काय करीत होते याची चौकशी करावी ,संदीप जाधव हे पोलीस अधिकारी ,कर्मचारी यांच्या बेहिशोबी पैसा आणि जंगम मालमत्तेबाबतची कामे करतात .त्यामुळेच काही वर्षात ते करोडो रुपयांचे मालक कसे झाले ,या बाबतची योग्य त्या शासकीय यंत्रणे कडून चौकशी झाल्यास बऱ्याच गोष्टी बाहेर येतील .सर्वात महत्वाचे म्हणजे संदीप जाधव .हेमंत गांधी हे कशा प्रकारे सर्वसामान्य लोकांच्या जमिनीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने ताबे मारतात यांची सखोल चौकशी झाल्यास खूप मोठे जमिनीचे गैर व्यवहाराचे RACKET उघडकीस येईल .


Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading