कोरोनावर ‘टॅबलेट कोरीच’ हे आयुर्वेदिक औषध देखील परिणामकारक
पुणे, दि. ११ – कोरोनाची सध्याची परिस्थिती भीषण होत असताना पुण्यातील डॉ. हृषीकेश रांगणेकर यांनी तयार केलेले ‘कोरीच’ हे आयुर्वेदिक औषध कोरोनावर सकारात्मक परिणाम करत असल्याचे दिसत आहे. आयसीएमआरच्या रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी, फरीदाबाद यांनी केलेल्या तपासण्यांमध्ये टॅबलेट ‘कोरीच’चे मिश्रण कोरोना विषाणूंची संख्या कमी करते असा निष्कर्ष आला असून राज्य एफडीएनेदेखील आयुर्वेदिक प्रोप्रायटरी मेडिसिन म्हणून याला मान्यता दिली आहे. पुण्यातील डॉ. रांगणेकर हे एम डी आयुर्वेद असून गेली १५ वर्षे ते आयुर्वेद आणि संशोधनात कार्यरत आहेत.
टॅबलेट कोरीचबद्दल अधिक माहिती देताना डॉ. रांगणेकर म्हणाले, “मागील वर्षी कोविड १९ ची साथ सुरु झाल्यानंतर या आजारावर आयुर्वेदाशी संबंधित उपाय शोधण्यासाठी मी संशोधन सुरु केले. यावर प्रभावी ठरतील अशा २० आयुर्वेदिक औषधांमधून किराततिक्त, कडूलिंब, अडूळसा आणि पिंपळी या चार आयुर्वेदिक वनस्पतींची निवड करीत मी सुरुवातीला चूर्ण तर नंतर गोळ्यांच्या स्वरूपात हे औषध बनविले. आयुर्वेदामध्ये ज्वर ही संज्ञा ताप, अंतर्गत सूज, संक्रमण अशा वेगवेगळ्या अर्थी वापरली जाते. सर्वसाधारणपणे कडू चवीच्या वनस्पती ज्वर चिकित्सेत वापरलेल्या दिसतात. मागील वर्षी जेव्हा कोव्हिड रुग्णांमध्ये कडू रसप्राधान्य असेली संयुगे वापरली तेव्हा चांगले परिणाम दिसून आले. कोरीच (CoReach) या औषधात प्राधान्याने कडू चवीची औषधे आहेत. सध्या हे औषध टॅबलेट स्वरूपात असून यामध्ये चूर्णाच्या हायड्रोअल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्टचा वापर करण्यात आला आहे. कोरोना या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर विषाणूचा प्रभाव कमी करण्याबरोबरच आजाराची लक्षणे कमी होणे, शरीरातील ऑक्सिजन पातळीत वाढ होणे, सीआरपी, डी डीमर सारख्या रक्तचाचण्या आटोक्यात ठेवणे, आजाराची गुंतागुंत कमी होऊन पर्यायाने रूग्णालयामधून लवकर डिस्चार्ज मिळणे असे औषधाचे काही फायदेदेखील समोर आले आहेत. औषध सुरु केल्यानंतर केवळ २ ते ३ दिवसातच रुग्णाला याचा फायदा होत आहे, हे विशेष.”
आजपर्यंत पाचशेहून अधिक जणांना या औषधाचा फायदा झाला असून यामुळे आजाराचा संसर्ग न होण्यास देखील मदत होत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे हे औषध देण्याअगोदर आणि दिल्यानंतर आम्ही ज्या रुग्णांचा व्हायरल लोड (विषाणूंची संख्या) तपासून पाहिला असता तो सरासरी ९८ % ने कमी झाला असल्याचे समोर आले आहे. सेल लाईन अभ्यास आणि रुग्णांमध्ये दिसून आलेली विषाणू संख्या घट यांचा संबंध लावता येईल. बहुतांश रूग्णांमधील रक्ताशी संबंधित बायोमार्कर (CRP इ.) आटोक्यात राहिले आहेत. थोडक्यात, कोरीचमुळे विषाणूंची संख्या आणि शरीरातील सूज आणि ताप कमी होऊन कोव्हिड रुग्णांना आराम मिळतो असे म्हणता येईल, असे डॉ. रांगणेकर यांनी नमूद केले.
याशिवाय ‘कोरीच प्लस’ हे नव्य चिंतामणी रस असलेले सुधारित औषध आजाराच्या गंभीर अवस्थेत वापरता येऊ शकेल तर कालमेघ या अजून एका कडू औषधापासून तयार केलेले ‘इरावटी’ हे औषध संक्रमण होऊ न देण्यासाठी उपयुक्त ठरु शकेल, असे डॉ. रांगणेकर म्हणाले. विशेष म्हणजे कालमेघपासून बनवलेल्या एका औषधाला थायलंडच्या स्वास्थ्य मंत्रालयाने कोविडसाठीचे औषध म्हणून मान्यता दिली आहे. कालमेघमधील कार्यकारी तत्व मानवी पेशींमध्ये कोरोना विषाणूला जाण्यापासून रोखतात हे इन-विट्रो अभ्यासात लक्षात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
डॉ. रांगणेकर यांनी केरळ मधील कोट्टाकल येथील आयुर्वेद विद्यालयामधून एम डी चे शिक्षण पूर्ण केले असून बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, सांताक्रुज, मुंबई येथून त्यांनी क्लिनिकल रिसर्चचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. गेली १५ वर्षे ते या क्षेत्रामधील संशोधनाशी संबंधित असून चार वर्ष नॅशनल एड्स रिसर्च इंस्टीट्युट (नारी) येथील संशोधनाचा त्यांना अनुभव आहे. सध्या क्वेस्ट वेलनेस (Questt wellness) च्या माध्यमातून कार्यरत आहेत.
टॅबलेट कोरीच हे रु ५८० या किंमतीत www.questtwellness.com या संकेतस्थळावर आणि निवडक आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध होऊ शकणार आहे.
