कोरोना – आज राज्यात तब्बल ४७ हजारांहून अधिक रुग्ण; २०० हुन अधिक बळी

मुंबई – राज्यात आज सर्वाधिक रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात लॉकडाऊन लागणार की नाही याबाबत चर्चा सुरू असतानाच आज ४७ हजार ८२७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील चिंता वाढली असून आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांचा वेग झपाट्याने वाढत जातोय. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यात दोन दिवसांत लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला आहे. त्यातच आज ४७ हजार ८२७ रुग्णांची वाढ झाली असून २०२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज २४ हजार १२६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत २४ लाख ५७ हजार ४९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात सध्या ३ लाख ८९ हजार ८३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान मुंबईत ८ हजार ८३२, ठाण्यात 1370, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ११०८ आणि पुण्यात 9 हजार 086 रुग्णांची वाढ झाली आहे.

पुणे शहर अपडेट्स

  • दिवसभरात ४६५३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ३३३७ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ४६ रुग्णांचा मृत्यू. ०७ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ४७५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २७८०९९.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३७१२६.
  • एकूण मृत्यू -५३७६.
    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २३५५९७.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २००७३.

Leave a Reply

%d bloggers like this: