शरद पवार ब्रीचकॅन्डीमध्ये दाखल; बुधवारी शस्त्रक्रिया

मुंबई, दि. २९ – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना आज (दि.२९ मार्च) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असून, त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून सांगितले.
शरद पवार यांना ३१ मार्चला त्यांच्यावर एण्डोस्कोपीनंतर आवश्यक ती शस्त्रक्रिया केली जाईल. तोपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: