Saturday, May 30, 2026
PUNE

आगामी सरकारी निमसरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा इशारा

पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरींग व लॉन्स असोसिएशन

पुणेः- गेल्या वर्षांपासून पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरींग व लॉन्स असोसिएशन आणि असोसिएशनवर अवलंबून इंडस्ट्री उद्याच्या आशेवर तग धरुन आहे. आगामी काळात सरकारने पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरींग व लॉन्स असोसिएशन आणि असोसिएशनवर अवलंबून इंडस्ट्री सभासदांना कोविड-19 नियमांच्या सरसकट चौकटीत न बसवता धोरणात लवचिकता आणावी. अन्यथा अंतिम उपाय म्हणून आगामी सरकारी निमसरकारी कार्यक्रमांवर असोसिएशनतर्फे बहिष्कार घालण्याचा इशारा पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरींग व लॉन्स असोसिएशनतर्फे आज आयोजीत पत्रकार परिषदेत देण्यात आला.

या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी असोसिएशनतर्फे सनदशीर मार्गाने आणि कोवड-19 संबंधी सध्या लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन करुन सामाजिक अंतर राखत मानवी साखळी करुन आंदोलन करण्यात आले. आंदोलना नंतर असोसिएशनतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरींग व लॉन्स असोसिएशनतर्फे असोसिएशनचे अध्यक्ष सिकंदर रमजान शेख (बबलू रमजानी), उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनचे
सदस्य सोमनाथ धेंडे, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा कुदळे, शिरीष पाठक, पुणे जिल्हा मांडव असोसिएशनचे अध्यक्ष सचिन भापकर, पुणे शहर मांडव असोसिएशनचे अध्यक्ष दगडे पाटील, पुणे केटरिंग असोसिएशनचे महाराष्ट्राचे विश्वस्त जी.एस. बिंद्रा, पुणे केटरिंग असोसिएशनचे महाराष्ट्राचे विश्वस्त किशोर सरपोतदार, पुणे केटरींग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश माळी, पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनचे माजी अध्यक्ष सचिन शिंदे, सूर्यकांत बंदावणे, मेहबूब खान, बंडूशेठ वाळवेकर, उदय इनामके, राजू कांबळे, स्टीव्हन नाथन्, सुभाष सरपाले आदी मान्यवर उपस्थित होते. या मूक निदर्शनात पुणे, मुंबई, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, रत्नागिरी अशा विविध ठिकाणांहून असोशिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

कोविड 19 च्या महामारीमुळे जवळपास 12 महिने कोणतेही मोठे कार्यक्रम झाले नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतर ‘अनलॉक’मध्ये इतर व्यवसायांना टप्प्याटप्प्याने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोविड 19 च्या दुस-या लाटेचे संकेत मिळत असल्याने शासनाने पूर्व परवानगी दिलेल्या आस्थापनांना देखील काही नियम व अटी घालून बंधने घातली आहेत. चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे यांना 50 टक्के उपस्थितीस, तर लग्न समारंभात 50 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी दिली आहे. परंतू लॉन्स किंवा बँक्वेट हॉल यांची रचना मूलतः एक हजार किंवा त्याहून व्यक्तींच्या दृष्टीने केलेली असते. अशा पार्श्वभूमीवर लग्न समारंभांना केवळ 50 पन्नास व्यक्तींची परवानगी दिल्याने लॉन्स किंवा बँक्वेट हॉलचे संपूर्ण आर्थिक नियोजन ढासळत आहे.

जाहीर कार्यक्रम, लग्न समारंभ, इव्हेंट्स, सांस्कृतिक सभागृहे, थिएटर, लॉन्स, केटरिंग यासंबंधित क्षेत्रात काम करणारे साउंड, लाईट, एलईडी वॉल, जनरेटर्स, फ्लोरिस्ट, डेकोरेटर्स, मंडप, व्हिडीओग्राफर्स, फोटोग्राफेर्स, बँड, इव्हेन्ट कोऑर्डिनेटर असे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. लाखो रुपयांची इक्विपमेंट्स धूळ खात पडून आहेत. तर या व्यवसायावर उपजीविका अवलंबून असलेल्या महाराष्ट्रातील जवळपास दीड ते दोन कोटी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

असोसिएशनशी संबंधीत व्यवसायिक आणि असोसिएशन सभासदांच्या समस्येवर बोलतांना असोसिएशनचे अध्यक्ष सिकंदर रमजान शेख (बबलू रमजानी) म्हणाले की, कोविड-19 सारख्या महामारीच्या काळात असोसिएशनच्या सदस्यांनी मानवतावादी दृष्टीकोनातून कोविड सेंटर उभे करण्यात पुढाकार घेतला. तसेच कोविडचा उच्चांक गाठला गेला असतांना असोसिएशनच्याच केटरींग विंगने जीवावर उदार होऊन, जीव धोक्यात घालून कोविड रुग्णांना जेवणाचे डबे पोहचविले. मार्च, एप्रिल, मे हा आमचा व्यवसायाचा मुख्य काळ असतो. या काळात होणा-या व्यवसायावर आधारीतच आगामी काळ आम्ही व्यथीत करीत असतो. तसेच सरकारच्या या निर्णयामुळे या व्यवसायवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अवलंबून असलेले हजारो कामगारांचा रोजगार गेला आहे.

असोसिएशनचे उपाध्यक्ष शैलेश गायकवाड म्हणाले की, ही सर्वात मोठी इंडस्ट्री असून कुशल आणि अकुशल तसेच शिक्षित आणि अशिक्षीत बेरोजगांरांच्या हाताला काम देणारी सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. मानवतेच्या भावनेतून गेल्या वर्षभर कामगारांची जबाबदारी आम्ही निभावली. त्यासाठी प्रसंगी आमच्यापैकी काहींनी कर्ज काढले, घरातील सोने विकले, मुदतठेवी मोडल्या परंतू यापुढील काळातही निर्बंध असेच विसंगत पद्धतीने लादले गेल्यास कामगारांच्या हाताला काम आणि दाम देणे शक्य होणार नाही. यातून वेगळेच सामाजिक प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.

पुणे केटरिंग असोसिएशनचे महाराष्ट्राचे विश्वस्त जी.एस. बिंद्रा, पुणे केटरिंग असोसिएशनचे महाराष्ट्राचे विश्वस्त किशोर सरपोतदार म्हणाले की, असोसिएशन म्हणून आमच्या बाजूने जबाबदारीचा भाग म्हणून आम्ही आमच्या सह आमच्या इथे काम करणा-या सेवेकरींचे लसीकरण करुन घेऊ, तसेच काम स्विकारतांना पार्टी सोबत करोनाचे नियम कडक पद्धतीने पाळले जातील, याबाबत करार करु व तो करार पाळला जात नाही, असे लक्षात आल्यास सरकारचे प्रतिनिधी या नात्याने आम्हीच पोलीस यंत्रणा किंवा कोविड प्रतिबंधक यंत्रणेला कळवू. सरकारला सहाय्यभुत ठरेल असाच आमचा दृष्टीकोन असून सरकारने देखील आमचा विचार केला पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.

पुणे जिल्हा मांडव असोसिएशनचे अध्यक्ष सचिन भापकर, पुणे शहर मांडव असोसिएशनचे अध्यक्ष दगडे पाटील म्हणाले की, हजारो चौरस फूट लाॅंन्स किंवा हजार ते पंधराशे किंवा त्याहून जास्त क्षमता असलेल्या बॅंक्वेट हाॅल मध्ये केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीत लग्न कार्य लावावे हा निर्णय असोसिएशनवर अन्यायकारक आहे. असोसिएशनतर्फे आम्ही सरकारला पाचशे लोकांच्या उपस्थितीतही कोरोनाचे सर्व नियम पाळून कशा पद्धतीने लग्न होऊ शकतात, याचे प्रात्येक्षिक देऊ शकतो. आजवर नगरसेवक, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सर्व पातळ्यांवर निवेदने देऊन झाली अाहेत परंतु त्याबाबत गांभीर्याने विचार केला गेलेला नाही. आज असोसिएशन आणि असोसिएशन संबंधीत सर्व उद्योग व्यवसायांतून देशाच्या एकूण जीडीपीच्या आठ टक्के भाग, हा आमच्या असोसिएशन कडून दिला जातो. तरी सुद्धा आमच्या बाबत अन्यायकारक भूमिका घेतली जात असून आम्ही सनदशीर मार्गाने त्या भूमिकेचा निषेध करीत आहोत.

बंडूशेठ वाळवेकर म्हणाले, सरकारच्या महसुलात भर घालणारी दुय्यम निबंधकाची कार्यालये दाटीवाटीची असतांना तिथे नागरीकांची तोबा गर्दी होते आणि तिकडे सरकार कानाडोळा करते, पीएमटी पीएमपीएल सारख्या स्थानिक वाहतूक व्यवस्थेद्वारे होणारी प्रवासी वाहतूक नियमांनुसार होत नाही. तिकडे सरकार कानाडोळा करते, राजकीय किंवा मोठ्या उद्योगपतींची लग्ने समारंभे मोठ्या थाटामाटात पार पडतात, तेव्हां तिथे करोना पसरत नाही किंवा लागणही होत नाही अशी दुटप्पी भूमिका सरकार कसेे घेऊ शकते.

पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनचे
सदस्य सोमनाथ धेंडे म्हणाले की, आम्ही जबाबदारी घेऊन ग्राहक पातळीवर जागृती प्रबोधन करुन सन्मानाने आयुष्य जगू इच्छितो तर त्यास सरकारच्या नियमांची आडकाठी का येते. आगामी काळात लोकांच्या मनातील भीती संपुष्टात येईल, या दृष्टीने देखील आम्ही कॅम्पनींग करणार असून त्यांच्यात पुर्णतः सुरक्षिततेची भावना कशी वाढेल, याच दृष्टीने आमचे मार्गक्रमण असेल.

सरकारने चर्चा करून नियमांमध्ये योग्य ते बदल करावे, अन्यथा अंतिम उपाय म्हणून आगामी सरकारी निमसरकारी कार्यक्रमांवर असोसिएशनतर्फे बहिष्कार घालण्याचा इशारा पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरींग व लॉन्स असोसिएशनतर्फे या पत्रकार परिषदेत देण्यात आला.

यावेळी झालेल्या मूक निदर्शनात डीजे असोसिएशचे अध्यक्ष हर्ष साळवी आणि उपाध्यक्ष अभिजीत राठोड, लॉन्स असोसिएशनचे अध्यक्ष चेतन रावडे, इव्हेंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण जाधव आणि उपाध्यक्ष गुड्डू मिश्रा, ‘पाला’ असोसिएशन, मुंबईचे जीतू मोरे आणि मॅनिअल, पिंपरी-चिंचवडचे अनुप कोठावळे, नागपूरचे संदीप बारसकर, सोलापूरचे विश्वनाथ धोत्रे, नाशिकचे शोहन, बारामतीचे कानिफ नागे, फलटणचे रफिक बागवान, जळगावचे जितू नारखेडे, औरंगाबादचे प्रितम गोसावी, अहमदनगरचे शिवदत्त पांढरे, साताराचे मनोज शेंडे, इचलकरंजीचे नंदू सव्वाशे, कोल्हापूरचे मुनीर मुल्ला आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading