Saturday, May 30, 2026
LIFESTYLE

नितळ सौंदर्यः नवीन अभ्यासातून चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि त्वचेवरील पिगमेंटेशनसाठी रोजच्या बदाम सेवनाची तपासणी

नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की, तुमच्या रोजच्या त्वचेच्या काळजीत बदामाचा समावेश करण्याचे एकापेक्षा जास्त कारण असू शकते. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, डेव्हिसमधील[1] नवीन अभ्यासाच्या संशोधकांना हे दिसून आले की, नेहमीच्या कॅलरीयुक्त स्नॅक्सच्या सेवनाऐवजी बदामांचे सेवन केल्यामुळे मेनोपॉज आलेल्या महिलांमध्ये सुरकुत्यांचे प्रमाण तसेच त्वचेवरील पिगमेंटेशनही कमी झाले. अभ्यासाचे प्रायोजक आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया होते आणि त्यांनी २०१९ मध्‍ये केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्षांची हमी दिली आहे. 

या ६ महिन्यांच्या यादृच्छिकृत नियंत्रित चाचणीत फित्झपॅट्रिक स्किन टाइप १ किंवा २ (सूर्यप्रकाशात त्वचा जास्त जळण्याची शक्यतेचे गुणधर्म) असलेल्या ४९ तंदुरूस्त पोस्टमेनोपॉजल महिलांचा समावेश केला होता. सहभागींना दोनपैकी एका समूहात यादृच्छिक पद्धतीने सहभागी करून घेतले होतेः हस्तक्षेप समूहात महिलांनी स्नॅक म्हणून बदामांचे सेवन केले. ते त्यांच्या रोजच्या कॅलरीच्या एकूण २० टक्के होते किंवा सरासरी प्रतिदिन ३४० कॅलरी (सुमारे ६० ग्रॅम.) नियंत्रण समूहाने एक कॅलरी संतुलित आहाराचे सेवन केले, ज्यात २० टक्के कॅलरीज होत्याः एक फिग बार, ग्रॅनोला बार किंवा प्रेत्झेल्स. या स्नॅक्सबरोबरच अभ्यासातील सहभागींनी त्यांचा नियमित आहार घेतला आणि त्यांनी दाणे किंवा दाण्यांशी संबंधित उत्पादनांचे सेवन केले नाही.

अभ्यासाच्या सुरूवातीला त्वचेची चाचणी केली गेली आणि त्यानंतर पुन्हा ८ आठवड्यांनी, १६ आठवड्यांनी आणि २४ आठवड्यांनी केली गेली. यातील प्रत्येक भेटीच्या वेळी चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि चेहऱ्यावरील पिगमेंटचे प्रमाण हाय रेझोल्यूशन फेशियल इमेजिंग आणि वैधीकृत ३ डी फेशियल मॉडेलिंग आणि मोजणी याद्वारे तपासण्यात आले. त्वचेचे हायड्रेशन, ट्रान्सेपिडर्मल वॉटर लॉस (टीईडब्ल्यूएल) आणि सेबम एक्स्क्रेशनही तपासण्यात आले.

संशोधकांना बदामाचे सेवन करणाऱ्या समूहात सुरकुत्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून आलेः १६ आठवड्यांनी १५ टक्के घट होती तर २४ आठवड्यांनी १६ टक्के घट झाली होती.

बदाम सेवन करणाऱ्यांच्या समूहात एकूणच फेशियल पिगमेंटच्या प्रमाणातही एक मोठ्या प्रमाणावर घट झाली होती (त्वचेच्या पोताची असमानता). १६व्या आठवड्यात २० टक्के घट झाली होती आणि ती २४व्या आठवड्यापर्यंत कायम राहिली. तसेच अगदी सुरूवातीपासून २४ आठवड्यांपर्यंत बदाम ग्रुप आणि नियंत्रण समूहांसाठी शरीराचे वजनही कायम राहिले.

“बदामाचे रोजचे सेवन हे फित्झपॅट्रिक स्किन टाइप १ किंवा २ असलेल्या पोस्टमेनोपॉजल महिलांमध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे दिसणे आणि त्वचेचा पोत यांत सुधारणा करण्याचे एक उत्तम माध्यम ठरू शकते (पिगमेंटचे प्रमाण कमी झाल्यामुळे). ग्राहक या कमी झालेल्या पिगमेंटेशन परिणामाला एक जास्त समान त्वचेचा पोत असणे या प्रकारे सांगू शकतात,” असे मत डॉ. राजा शिवमणी, डर्मिटॉलॉजिस्ट आणि या अभ्यासाचे प्रमुख संशोधक यांनी व्यक्त केले.

ट्रान्सएपिडर्मल वॉटर लॉस, त्वचेचे हायड्रेशन आणि सिबम एक्स्क्रेशन यांचेही मोजमाप अभ्यासादरम्यान दोन्ही समूहांमध्ये कपाळावर तसेच गालांवर करण्यात आले.

·        बदाम आणि नियंत्रण समूहात कोणत्याही वेळी ट्रान्सएपिडर्मल वॉटर लॉसमध्ये कोणताही फरक पडला नाही.

·        अभ्यासाच्या शेवटी दोन्ही समूहांमध्ये त्वचेच्या हायड्रेशनमध्ये वाढ झाली होती.

·        सिबम एक्स्क्रेशन दराकडे पाहता, दोन्ही समूहांत गालांवर वाढ झाल्याचे दिसून आले परंतु फक्त नियंत्रण समूहात कपाळावरही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

“आमचे निष्कर्ष फक्त एकच पोषक घटकासह संभाव्य फायदे अतिसोपे करून सांगण्याऐवजी अल्फा टोकोपेराल (व्हिटॅमिन ई) आणि उत्तम अनसॅच्युरेटेड फॅट्स अशा विविध पोषण घटकांसह एक संपूर्ण आहार म्हणून बदामांकडे पाहण्यावर भर देण्यासाठी होते. बदामांत मोठ्या प्रमाणावर अल्फा-टोकोफेराल आहे. त्याचे कार्य अँटीऑक्सिडंटचे आहे आणि त्यामुळे पोस्टमेनोपॉजल महिलांमध्ये सुरकुत्या आणि त्वचेचा पोत यांच्यामध्ये आपल्याला दिसणाऱ्या परिणामांसाठी ते अंशतः संभाव्य ठरू शकते,” असे डॉ. शिवमणी म्हणाले.

या अभ्यासाच्या निष्कर्षाबाबत बोलताना डॉ. गीतिका मित्तल गुप्ता, डर्मिटोलॉजिस्ट अँड कॉस्मेटोलॉजिस्ट म्हणाल्या की, ”या अभ्यासातून चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्येच मोठ्या सुधारणा दिसत नाही तर रोजच्या बदामाच्या वापराने त्वचेचा पोतही सुधारतो हे पाहणे आनंदाची गोष्ट आहे. हे निष्कर्ष भारतात मुख्यत्वे सुसंगत आहेत. कारण सूर्यप्रकाश जास्त आणि पर्यावरणाच्या इतर बाबींमुळे त्वचेचा पोत असमान होतो. बदाम हे अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन ई चे उत्तम स्त्रोत आहेत आणि आवश्यक फॅटी अ‍ॅसिड्स आणि पॉलिफेनोल्स देतात. त्यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी त्यांचा वापर रोजच्या आहारात करता येतो. या अभ्यासातून बदामांमुळे त्वचेचे आरोग्य अधिक चांगले होते या विश्वासाला बळकटी दिली आहे. मी महिलांना त्वचेचे आरोग्य मिळवण्यासाठी त्यांच्या रोजच्या आहारात बदामांचा समावेश करण्याचा आग्रह धरते.”

या अभ्यासाच्या मर्यादेत २४ आठवड्यांचा कालावधी हा असून दीर्घकाळ बदामांचे सेवन केल्याने होणारे संभाव्य परिणाम त्यात दाखवलेले नाहीत. तसेच या अभ्यासातील सहभागी पोस्टमेनोपॉजल महिला फित्झपॅट्रिक स्किन टाइप १ किंवा २ स्वरूपाच्या (सूर्यप्रकाशात आल्यावर त्वचा जळण्याची जास्त शक्यता दिसणाऱ्या) होत्या. त्यामुळे इतर लोकांमध्ये बदामाच्या सेवनाचा परिणाम तपासण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे. तसेच, दोन्ही समूहातील स्नॅक्सच्या कॅलरी एकसारख्या असल्या तरी त्यांचे पोषक घटक संतुलित नव्हते.

या अभ्यासाचे निष्कर्ष मान्य करताना रितीका समादार, प्रादेशिक प्रमुख- डाएटेटिक्स, मॅक्स हेल्थकेअर- दिल्ली म्हणाल्या की, “बदामाचे आरोग्याशी संबंधित इतर फायदे भूतकाळातील इतर अनेक क्लिनिकल अभ्यासातून दिसून येत असले तरी हे नवीन संशोधन त्वचेच्या आरोग्याबाबत उत्तम निष्कर्ष देते- कारण हा विषय प्रत्येक महिलेच्या जिव्हाळ्याचा आहे. या निकालांतून बदामांचे रोजचे सेवन केल्याने त्वचेवरील पिगमेंटेशन आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते हे दिसून येते. त्वचेचे आरोग्य सुधारण्यात आहार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो हे सत्य आहे आणि हे संशोधन त्या सत्याला आधार देण्यासाठी आणखी पुरावे देते.”

शीला कृष्णस्वामी, पोषण आणि आरोग्य सल्लागार म्हणाल्या की,”आजच्या काळात आणि युगात जिथे प्रदूषण व विषद्रव्ये आपल्या आरोग्यावर प्रभाव टाकत आहेत अशा परिस्थितीत आपण आपल्या त्वचेची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य आहारातून शरीरावर हे लोकप्रिय सत्य आहे आणि हा अभ्यास त्याचे प्रतीक आहे. नवीन अभ्यासातून बदाम त्वचेवरील पिगमेंटेशनचे प्रमाण कमी करून अधिक चांगली त्वचा देण्यास मदत करते हेच सिद्ध होत नाही तर बदाम खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते या आधीच्या पुराव्यंनाही आधार मिळतो. या अभ्यासाचे निष्कर्ष लक्षात घेऊन मी महिलांना आणि विशेषतः पोस्टमॅन्युपॉजल वयातील महिलांना दीर्घकालीन स्वरूपात जास्त चांगले त्वचेचे आरोग्य मिळवण्यासाठी दररोज मूठभर बदाम खाण्याचा सल्ला देते.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading