PMP राजयोग सोसायटी ते स्वारगेट बससेवा सुरू

पुणे, दि. १० – पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक ११८ अ राजयोग सोसायटी ते स्वारगेट मार्गे सनसिटी हि बससेवा सुरू करण्यात आली. पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार,नगरसेविका राजश्री नवले यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले.


यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बससेवेचा मार्ग राजयोग सोसायटी, प्रयेजा सोसायटी,सनसिटी, माणिकबाग, आनंदनगर, हिंगणे, राजाराम पूल,पु. ल. देशपांडे उद्यान, पानमळा, दांडेकर पूल,पर्वती पायथा,स्वारगेट असा असेल.
यावेळी बोलताना शंकर पवार म्हणाले,राजयोग सोसायटी ते स्वारगेट हि बससेवा सुरू झाल्याने प्रामुख्याने ज्येष्ठ नागरीक, महिला, विद्यार्थी यांच्यासह या परिसरात असणाऱ्या पुणे मनपाच्या स्व. मुरलीधर लायगुडे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या नागरीकांची देखील चांगली सोय होणार आहे.
कार्यक्रमास प्रा. राजू मते, आनंद दांगट, दिलीप नवले, सारंग नवले,डॉ.राजेंद्र देशमुख, परशुराम मोरे, सचिन मनोळीकर, उमेश देशपांडे, सुहास चांडक, बबन कुंभारकर,स्वारगेट आगार कार्यालय अधिक्षक सुनिल कांबळे, उल्हास पानसरे उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: