सर्फ एक्सेलच्या नवीन होळी विशेष जाहिरातीमध्ये नाहीसा होतो भावनिक दुरावा

पुणे, दि. 5 –  गतवर्षात समाजातील सर्वच घटक एकमेकांपासून दुरावले गेले. मानवी मुल्यानांच एकप्रकारे या साथरोगाने हात घातला होता आणि त्यामुळे आपले सामाजिक व भावनिक संबंध दुरावले गेले होते. आता आपली जीवनशैली हळूहळू पूर्वपदावर जात असल्याचे जरी जाणवत असले तरी समाजातील काही घटक आजही सामाजिकदृष्ट्या सुरक्षेच्या दृष्टीने दुरावलेले आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि वयस्क लोकांना अजूनही या साथरोगाचा धोका जाणवत असल्याने त्यांचे जीवन पूर्वपदावर आलेले नाही. आपल्या सर्वांनाच आपल्या प्रियजनांना भेटायचे वेध लागलेले असतना, आजही प्रवास करणे आणि सामाजिकदृष्ट्या एकमेकांमध्ये मिसळणे हे धोक्याचे मानले जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे थोडे त्रासदायक असते कारण त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपासून खूप वेळ लांब राहावे लागत असल्याने भावनिक आणि सामाजिक प्रेमापासून वंचित राहावे लागते.

‘सर्फ एक्सेल’ची नवीन होळीविशेष प्रसार मोहीम ‘दाग अच्छे है, जी ब्रँडच्या नावाशी जोडली गेली आहे ती रंगांच्या माध्यमातून भावनिक एकत्रिकरणाची नवीन संकल्पना अधोरेखित करत आहे. यंदा होळीचे रंग आपल्या प्रियजनांमधील भावनिक दुरावा कसे दूर करतात आणि शारिरीक अंतर पाळूनही मनाने आपण सर्व कसे जवळ येतो, हेच यातून अधोरेखित केले गेले आहे

सर्फ एक्सेलची नवीन प्रसारमोहीम #रंगअच्छेहै (#RangAchheHain)मध्ये एक लहान मुलगा अगदी हृदयाला भिडणारी गोष्ट करतो. त्याला त्याचा मित्र रान्चोच्या सहायाने शेजारच्या वयस्क दाम्पत्याला होळीच्या सणात सामावून घ्यायचे आहे. रान्चो हा इतरांप्रमाणे या सणामध्ये सामील होवू शकत नाही, हे धान्यात आल्यावर तो मुलगा रान्चोबरोबर वेगळी कल्पना लढवत जबाबदारीने सण साजरा करतो. या टेलिव्हिजन जाहिरातीतून एक भावनिक साद घातली जाते कारण या जाहिरातीचे शब्द “मेरे हात नाही पहुचेंगे, इसलिये रंग पहुंचा दिए”, हे हृदयाला भिडणारे आहेत. त्या मुलाची कल्पकता आणि रान्चोच्या प्रती त्याने दाखविलेली सदहृदयता यातून होळीचे खरे रंग समोर येतात. शरीराने जरी आपण लांब असलो तरी त्यातून भावनिक बंध विस्कटू शकत नाहीत, हाच संदेश त्यातून जातो. जाहिरातून हेच भावनिक सत्य अगदी प्रभावीपणे समोर येते.

या प्रसारमोहीम आणि जाहिरातीच्या शुभारंभाबद्दल बोलताना हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या साऊथ आशियाहोम केअर विभागाच्या कार्यकारी संचालिका आणि उपाध्यक्ष प्रभा नरसिंहन म्हणाल्या, “आपल्या देशात होळी हा एक सर्वात मोठा आणि सर्वाधिक लोकप्रिय सण आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही आमच्या होळी विशेष प्रसार मोहिमांच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांशी प्रभावीपणे जोडले गेले आहोत. हे वर्ष जरा वेगळे आहे कारण आजही आपण वैश्विक साथरोगातून बाहेर आलेलो नाही. हा साथरोगाने आपल्यामध्ये भावनिक आणि शारिरीक अंतर निर्माण केले आहे. ज्या समाजघटकांना या साथीचा सर्वाधिक धोका आहे, त्यांच्या भावनिक गरजा मांडताना, या जाहिरातीतील छोटा मुलगा या सणामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला कशाप्रकारे सामावून घेतो याचे चित्रण केले गेले आहे. जिथे हात पोहोचू शकत नाहीत तिथे कल्पकतेच्या माध्यमातून अगदी सहजपणे रंग कशाप्रकारे पोहोचू शकतात, हेच यातून अधोरेखित केले गेले आहे. ‘दाग अच्छे है’ या आमच्या ब्रँडच्या तत्वाज्ञानाला नैसर्गिकपणे पुढे नेत या भावना मांडल्या गेल्या आहेत. या संकल्पनेमध्ये आम्ही नेहमीच मुलांना चांगली कामे करताना घाणीत माखलेले दाखवले आहे, पण त्यातून नेहमीच चांगली मुल्ये अधोरेखित केली गेली आहेत. या सणाच्या निमित्ताने या प्रसार मोहिमेच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या परीजनांशी जोडले जाण्यासाठी नवीन संकल्पना सुचतील, अशी आम्हाला खात्री आहे.“

या प्रसार मोहिमेच्या संकल्पनेबद्दल बोलताना क्रिएटीव्ह संचालक कार्लोस परेरा म्हणाले,“होळीचे रंग लोकांना कशाप्रकारे एकत्र आणू शकतात’या संकल्पनेवर ही जाहिरात बेतलेली आहे. यंदा साथरोगामुळे सण साजरे करण्यावर बंधने आली आहेत. त्यामुळे त्या बंधनामध्येही होळी जबाबदारीने कशी साजरी केली जावू शकते हे दाखविणे महत्वाचे होते. आपल्यामध्ये शारिरीक अंतर असले तरी, भावनिक एकसंधता साधण्यासाठी रंग कशाप्रकारे एक माध्यम बनू शकतात, हेच या मोहिमेतून समोर आले आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: