अनिर्बन घोष यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक व राज्यप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला

पुणे :- महाराष्ट्र राज्यात पीओएल (पेट्रोलियम, ऑईलआणि ल्युब्स) सेवा गरजांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने अनिर्बन घोष यांनी  महाराष्ट्र आणि गोवा राज्यात इंडियन ऑईलचे नवीन कार्यकारी संचालक व राज्यप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. मार्केटिंग विभाग प्रमुख कार्यालय आणि  पश्चिम भागात तीन दशकांहून अधिक उत्तम आणि वैविध्यपूर्ण अनुभवासह, श्री घोष यांच्यामध्ये  ऑपरेशन्स, अभियांत्रिकी आणि किरकोळ विक्रीच्या कार्यात्मक क्षेत्रातील समृद्ध कौशल्य आहे.

सिविल इंजिनियर आणि मॅनेजमेंट ग्रॅज्युएट म्हणून त्यांनी इंडियन ऑइल इथे एनएफआर(नॉन फ्युअल रेवेन्यु)  उपक्रमा मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली असून बँकिंग आणि ऑटोमोटिव  सेवा क्षेत्रातील नामांकित नावांशी  देखील त्यांनी करार केला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: