IND vs ENG भारताचा दणदणीत विजय

अहमदाबाद, दि. 6 — टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत टीम इंडियाचा डाव आणि 25 धावांनी विजय झाला आहे. अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने पुन्हा एकदा कमाल केली आहे. अक्षर आणि अश्विन या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडने पाचारण केलं आहे. इंग्लंडचा दुसरा डाव या फिरकी जोडीने अवघ्या 135 धावांवर गुंडाळला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 160 धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडने दुसऱ्या इनिंगमध्ये 135 सर्वबाद धावा केल्या. यामुळे इंडियाचा 25 धावा आणि डावाने विजय झाला आहे. टीम इंडियाने या सामन्यासह ही मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भिडणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: