कुसुमाग्रजांच्या लेखनावर भाषण, कविता

पुणे, दि. २ – आझम कॅम्पस मधील ‘पै परवाज डिव्हिजन’ मध्ये ऑनलाईन मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे भाग घेतला . इयता ८ वी व ९ वी तील समीन पठाण, आसरा शेख, शाहीद पानसरे, जुनेद शेख , फिजा शेख यांनी मराठीच्या वापरावर व कुसुमाग्रजांच्या लेखनावर भाषण केले तर हफशा शेख आणि झैनब तांबेळी यांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या .कार्यक्रमाचे संयोजन राजेंद्र पवार यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचा उगम व विकास कसा होत गेला व मराठीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे याचे मार्गदर्शन केले तर बिल्किस सय्यद यांनी मराठी भाषेचा इतिहास सांगितला .

या कार्यक्रमामध्ये पाई परवाज डिव्हिजनच्या संचालक मुमताज सय्यद सहभागी झाल्या . एम . सी . ई.सोसायटीचे अध्यक्ष डॉ . पी. ए. इनामदार यांनी आभार मानले . यावेळी सर्व शिक्षक हजर होते .

Leave a Reply

%d bloggers like this: