शरद पवार यांनी घेतली कोरोना लस

मुंबई — देशात 1 मार्चपासून कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. यामध्ये 60 वर्ष पुर्ण असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाची लस घेतली आहे.

शरद पवार यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात करोनाची लस घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी लसीकरणासंदर्भात व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेेळी त्यांनी नागरिकांना आवाहनही केलं आहे.

मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असं आवाहन शरद पवारांनी ज्येष्ठ नागरिकांना केलं आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज कोरोनाची लस घेतली आहे. सकाळी सात वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: