… अन् कॅनव्हासवर उमटल्या बोलक्या रेषा

पुणे : रेषांच्या माध्यमातून साकारलेली व्यक्तीचित्रे आणि त्यातून त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये बोलक्या रेषातून उमगले. रेषा नेमक्या बोलतात तरी कशा हे चित्रकलेच्या माध्यमातून घनश्याम देशमुख यांनी सांगितले. तसेच चारकोलच्या माध्यमातून चित्रकलेचे सौंदर्य अनुभविण्याची संधी देखील पुणेकरांना मिळाली.

स्टारविन्स ग्रुप यांच्या वतीने बालगंधर्व कलादालन येथे स्टारविन्स आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलमध्ये  घनश्याम देशमुख यांच्या बोलक्या रेषा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तर चित्रकार महालक्ष्मी देशमुख यांच्या चारकोल रेखाटने या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी स्टारविन्स ग्रुपचे प्रणव तावरे, स्वरदा देवधर, राज लोखंडे, मिहीका अजिथ यावेळी उपस्थित होते. 

फेस्टिवलमध्ये देशभरातून विविध छायाचित्रकारांनी काढलेली छायाचित्रे तसेच रेखाटलेली  पेंटिंग्स पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनाचे यंदा ५ वे वर्ष आहे. दरवर्षी क्षण छायाचित्र प्रदर्शन,पॅलेट चित्र प्रदर्शन आणि कलाधिपती छायाचित्र प्रदर्शन भरविले जाते. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच असे आर्ट फेस्टिवल होत आहे. २०२० या वर्षांत कोरोनामुळे प्रदर्शनाचे आयोजन करता आले नाही. त्यामुळे एकत्रित प्रदर्शनांचे आर्ट फेस्टिवल भरविण्यात येत आहे. फेस्टिवलच्या माध्यमातून  ग्रुपने नेहमीच नवोदित छायाचित्रकर आणि चित्रकारांना संधी दिली आहे. 

शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बालगंधर्व कलादालन येथे स्टारविन्स आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.  सकाळी १० ते ८ या वेळेत पुणेकरांसाठी  फेस्टिवल खुले असणार आहे. फेस्टिवलसाठी विनामूल्य प्रवेश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकरांनी कलेची अनुभूती घेण्यासाठी फेस्टिवलला भेट द्यावी असे आवाहन स्टारविन्स ग्रुपतर्फे करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: