Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRATOP NEWS

‘मी मर्द आहे, असं मुख्यमंत्र्यांनी भाषणात म्हणून नये,’ निलेश राणेंची टीका

मुंबई, दि. 25 – टिक टॉक स्टार पूजा चव्हाण प्रकरणावरुन विरोधकांकडून ठाकरे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. संजय राठोड यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप विरोधक वारंवार करत असतानाच पोहरादेवी गर्दी जमवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. बुधवारी संजय राठोड यांनी मुंबईत येत मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. यामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी केली आहे. तर भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निशाण साधला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकार संजय राठोड यांना वाचवत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले आहेत की, “ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवतंय. सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तिप्रदर्शन करतो, कॅबिनेट मीटिंगमध्ये बसतो पण तरीही त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही”. “परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे‘,” असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान दुसरीकडे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पुण्यात घटनास्थळी भेट दिली. पूजा चव्हाण ज्या इमारतीत राहत होती, जिथे तिने आत्महत्या केली त्या इमारतीची चित्रा वाघ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण राहत होती ती रुम सील करण्यात आली असल्याचं सांगितलं. यामुळे त्यांनी इमारतीमधील दुसऱ्या घरात जाऊन गॅलरीची उंची तसंच इतर गोष्टींची पाहणी केली. यानंतर चित्रा वाघ वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या. मात्र यावेळी त्यांचा संताप झाला आणि त्यांनी थेट पोलिसांसमोरच तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित लाज वाटली पाहिजे अशा शब्दांत टीका केली. “महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात हे धूळ फेकत आहेत. लेखी परवानगी नाही असं सांगत आहे. जी दोन मुलं प्रत्यक्षदर्शी होती त्यांना तर सोडून दिलं. हे प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे. लाज वाटली पाहिजे यांना,” अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी पोलीस स्थानकाबाहेर संताप व्यक्त केला.

यावरुनही निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. “पूजा चव्हाण हत्या प्रकरणामध्ये सौ. चित्राताई वाघ वानवडी पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक बघून आश्चर्य वाटलं. एक गुन्हेगार मंत्र्याला वाचवण्यासाठी पोलीस किती तत्पर आहेत यावरून लक्षात आलं,” अशी टीका त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading