पूजा चव्हाण प्रकरण – पुणे पोलिसांकडून तपास काढून घ्या – चित्रा वाघ

पुणे, दि. 25 – पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी कुणाचा लेखी आदेश हवा आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन अजून कोणाचे आदेश हवा आहे ? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला त्याबरोबर संजय राठोडला चपलेने झोडला पाहिजे हा पूजाचा हत्यार आहे. त्याचा लवकरचं राजीनामा घ्यावा. तसेच पुणे पोलिसांकडून तपास काढून घेतला पाहिजे. असेही त्या म्हणाल्या.

पूजा चव्हाणचा फ्लॅट पोलिसांनी तपासासाठी सील केला आहे. परंतु मी आज प्रत्यक्ष पाहणी करुन ती किती उंचावरुन पडली किंवा काय आणि नेमके हे कसे घडले असेल याची पाहणी करतेयं, तसेच अधिक माहिती स्थानिक नेत्यांकडून घेणार असल्याचीही माहिती चित्रा वाघ यांनी दिली. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पुणे पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. आत्महत्येच्या तक्रारीबद्दल विचारणा केली असताना तक्रार नाही असे वानवडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच पुणे पोलिसांकडून तपास काढून घेतला पाहिजे. दोन आरोपींना सोडून देण्यात आले, कोणाला वाचवण्यासाठी तर त्या वनमंत्र्याला. पुणे पोलीस रक्षक नाही तर पूजाचे भक्षक असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्रातील सक्षम आयपीएस अधिकाऱ्याला दिला पाहिजे कारण पुणे पोलिस चाकरी करतं आहेत.

त्यानंतर चित्रा वाघ पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मंत्रीच बलात्कारी झाल्याचा आरोप करत त्यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले. पूजा प्रकरणानंतर १५ दिवस अज्ञातवासात गेलेले संजय राठोड दोनच दिवसापूर्वी पोहरादेवी गडावर अवतरले होते. त्यावरही चित्रा वाघ यांनी टीका केली. १५ दिवस कुठे तोंड लपवून बसले होते. असा सवाल त्यांनी केला. तसेच पूजाच्या कुटुंबियांनी तक्रार जरी केली केली नसली तरीही पोलिस स्युमोटो तक्रार करु शकत होते. पण तसे त्यांनी केले नाही. त्यांच्यावर दबाव आहे. संजय राठोड यांची १७ दिवसानंतरही पोलिसांनी तक्रार का केली नाही. तसेच पूजाबरोबरचे अन्य दोन जण कुठे आहेत? त्यांना अटक का झाली नाही? 12 ऑडिओ क्लिपचे पुढे काय झालं. या सरकारमध्ये आयाबहीणी सुरक्षित नाहीत. अरुण राठोडला सतत फोन येत होते ते फोन संजय राठोड यांचेच होते. तरीही अरुण राठोडचे कॉल डिटेल्स पोलिसांनी का नाही घेतले? तर अरुण राठोडसह दुसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी का सोडलं असे सवाल करत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

यवतमाळमध्ये पूजाचा गर्भपात करण्यात आला. मी डीजींबरोबर बोलले त्यावर त्यांनी इथे कोणीही चौकशीसाठी आले नाही असे सांगितले. पोलिसांना संजय राठोड दिसतचं नाही. ते मिस्टर इंडिया झालेत.

संजय राठोड पोहरादेवी गडावर गेल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अलोट गर्दी केली होती. यावरही चित्रा वाघ यांनी भाष्य केले. मुख्यमंत्र्यांनी मी जबाबदार मोहिम सुरु केली आहे. अनेक मंत्र्यांनी सभा रद्द केल्या मात्र संजय राठोडने मी निर्दोष आहे हे सांगण्यासाठी गर्दी जमावली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले नियम धाब्यावर बसून कोरोना पसरवण्याचे काम केले राठोडांनी केले. त्यामुळे संजय राठोडांवर आणि आयोजकांवर कारवाई करावी.

शरद पवारांनी मी ओळखते ते कधीही या प्रकरणाला पाठींबा देणार नाहीत. तसेच ठाकरे सरकार संवेदनशील आहे. ते नक्कीच यावरती काय तरी करतील असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बोलताना ”बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळे मंत्री एकत्र आले. फक्त आपल्या खुर्च्या वाचवल्या आहेत, जनतेला काय उत्तर देणार?” असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांच्या तपासावरही संशय व्यक्त केला आहे. “पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. या प्रकरणात कुणीही पुणे पोलिसांच्या ताब्यात नाही. पोलिसांना कुणाचाही कॉल लॉग कसा मिळाला नाही?, पुणे पोलिसांकडून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकायचं काम सुरू आहे” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: