लहान मुलांना आरोग्‍यदायी खाण्‍याच्‍या सवयी लावल्‍यास त्‍यांचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत होईल

पोषणतज्ञ व पिलेट्स तज्ञ माधुरी रूईया यांचे मत

पालेभाज्‍या व पौष्टिक आहार सेवन करण्‍याच्‍यासंदर्भात मुले खूपच कंटाळा करतात आणि ते टाळण्‍याचा प्रयत्‍न करतात. मी मोठी होत असताना माझ्या आईने मी सेवन करत असलेल्‍या खाद्यपदार्थांबाबत विशेष काळजी घेतली आणि तिची माझ्यावर नेहमीच नजर असायची. आज मी आरोग्‍याबाबत दक्ष असण्याचे व फिटनेसचे श्रेय तिला दिते. मला आरोग्‍यदायी सेवनाचे महत्त्व समजले आणि आहाराच्‍या बाबतीत मी पालन केलेल्‍या वेळापत्रकाचे आभार मानते. यामुळे मला माझ्या मुलींसाठी वयाच्‍या सुरूवातीच्‍या काळापासूनच आरोग्‍यदायी आहाराचे नियोजन करण्‍यामध्‍ये मदत झाली. आपण पौष्टिक आहाराचे सेवन करत असाल, तर कधीतरी चव बदलणे ठीक आहे.

मला व्‍यक्तिश: विश्‍वास आहे की, मुलांमध्‍ये लहान वयातच चांगल्‍या आहाराच्‍या सवयी निर्माण केल्‍याने दीर्घकाळापर्यंत फायदा होतो. म्‍हणूनच मी देखील लहानपणीच ही गोष्‍ट अवलंबली आणि तुम्‍हाला देखील असे करण्‍याचा सल्‍ला देते. सुरूवात करण्‍याचा सर्वोत्तम मार्ग म्‍हणजे मुलांमध्‍ये घरीच उपलब्‍ध असलेल्‍या खाद्यपदार्थांमधून स्‍मार्ट निवड करण्‍यास प्रेरित करणे, मुलाला भूक लागली असताना स्‍वच्‍छ व आरोग्‍यदायी स्‍नॅक्‍स देणे आणि मुलाने कधीही खायला मागितल्‍यानंतर सर्वात आवडती निवड म्‍हणून पौष्टिक पदार्थांना प्राधान्‍य देणे. मुलांमध्‍ये सुरूवातीपासूनच खाद्यपदार्थांबाबत दक्षता बाळगण्‍याची ही सवय निर्माण केल्‍याने तो/ती प्रौढ झाल्‍यानंतर आरोग्‍यदायी सेवनाची सवय कायम राहण्‍यास मदत होईल.

बदाम

बदाम हे मुलांसाठी उत्तम स्‍नॅक्‍स आहेत. बदाम कुरकुरीत, चविष्‍ट व गोड असतात, ज्‍यामुळे बदामांच्‍या सेवनाला नाही म्‍हणता येऊच शकत नाही. तसेच बदामांमध्‍ये जीवनसत्त्व ई, मॅग्‍नेशियम, प्रथिन, रायबोफ्लेविन इत्‍यादींसारखे अनेक पौष्टिक घटक असतात, जे शरीराची वाढ व विकासासाठी महत्त्वाचे असतात. याव्‍यतिरिक्‍त बदामांमध्‍ये भूकेचे शमन करण्‍याचे गुणधर्म आहेत आणि मुलांना भोजनाच्या दरम्‍यानच्या काळात पोट भरल्‍यासारखे वाटण्‍यामध्‍ये मदत करतात. याव्‍यतिरिक्‍त बदाम झिंक, कॉपर व फोलेट सारखे रोगप्रतिकार शक्‍तीला साह्य करणारे पौष्टिक घटक असण्‍यासाठी ओळखले जातात. म्‍हणूनच मी तुमच्‍या मुलांच्‍या रोजच्‍या आहारामध्‍ये मूठभर बदामांचा समावेश करण्‍याचा सल्‍ला देते.

मुलांना बदाम खाण्‍यास कशाप्रकारे द्यावे आणि कशाप्रकारे ही सवय लावावी याबाबत गोंधळून गेला असाल तर तुम्‍ही विविध पद्धती वापरू शकता. पहिली व महत्त्वाची पद्धत म्‍हणजे तुमचे मूल तो/ती दिवसाची सुरवात भिजलेल्‍या किंवा सोललेल्‍या स्‍वरूपातील बदामांचे सेवन करतील किंवा त्‍यांच्‍या/तिच्‍या सकाळच्‍या मिल्‍कशेकमध्‍ये बदामांचा समावेश करू शकता किंवा जेवणानंतर मिष्‍टान्‍न म्‍हणून त्‍याच्‍या/तिच्‍या टिफिन बॉक्‍समध्‍ये ठेवू शकता. तुम्‍ही मूठभर बदामांची विभागणी करत विशिष्‍ट कालांतराने त्‍याला/तिला काही बदाम सेवन करायला देऊ शकता. याव्‍यतिरिक्‍त तुम्‍ही ओट्स, लापशी, कडधान्‍यांमध्‍ये बदामाची भर करत त्‍यांना खायला देऊ शकता. मुलाला या नित्‍यक्रमाची सवय झाली की मी तुम्‍हाला खात्री देते की, तो/ती बदाम न मिळाल्‍यास त्‍याबाबत निश्चित तुम्‍हाला विचारायला येईल आणि ही दीर्घकालीन रोजची सवय होऊन जाईल, ज्‍याचा तुम्‍हाला निश्चितच आनंद होईल.

हिरव्‍या पालेभाज्‍या

मुलांना हिरव्‍या पालेभाज्‍या आवडत नाहीत, हे वैश्विक तथ्‍य आहे. मी लहान असताना मला देखील पालेभाज्‍या आवडायच्‍या नाहीत. पण माझ्या आईने मी ते सेवन करण्‍याची खात्री घेतली. पालकांना मी सल्‍ला देते की, तुमच्‍या मुलाला हिरव्‍या पालेभाज्‍या आनंदाने सेवन करण्‍यास प्रवृत्त करण्‍यासाठी सर्जनशीलता व नाविन्‍यपूर्ण पद्धतींची गरज आहे. पण मुलाला पालेभाज्‍या खाण्‍याची सवय झाल्‍यानंतर माझ्यावर विश्‍वास ठेवा की, तुम्‍ही हा लढा जिंकला आहे. हिरव्‍या पालेभाज्‍यांमध्‍ये फायबर, फोलेट आणि जीवनसत्त्व ए व क असते. हे घटक शरीराच्‍या वाढीमध्‍ये मदत करतात. तसेच हिरव्‍या पालेभाज्‍या लठ्ठपणाचा धोका कमी होण्‍यामध्‍ये मदत करतात. हिरव्‍या पालेभाज्‍यांमध्‍ये अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट्सचे उच्‍च प्रमाण आहे, जे आपल्‍या शरीरामधील टॅाक्झिन्‍स कमी करण्‍यामध्‍ये मदत करतात. आसपास जंक फूड व गोड पदार्थांचे प्रमाण सर्वाधिक असल्‍यामुळे हिरव्‍या पालेभाज्‍या कोणत्‍याही पालकासाठी त्‍यांच्‍या मुलाचे वजन नियंत्रणात ठेवण्‍यासाठी उपयुक्‍त आहेत.

तुमच्‍या मुलगा/मुलीमध्‍ये हिरव्‍या पालेभाज्‍यांचे सेवन करण्‍याची आवड निर्माण करण्‍याची उत्तम पद्धत म्हणजे त्‍यांना आवडणा-या खाद्यपदार्थांमध्‍ये त्‍यांची भर करा. तुम्‍ही वेगळे व चविष्‍ट सलाड्स (लेटस, फेटा किंवा हंगामी फळासह) बनवू शकता, ते घरी बनवलेले पिझ्झा किंवा पास्‍तामध्‍ये टाकू शकता किंवा सँडविच बनवू शकता. हिरव्‍या पालेभाज्‍यांना नवीन स्‍वरूप देणे महत्त्वाचे आहे. तुम्‍ही जितके वेगवेगळे प्रयोग कराल, तितके तुमचा मुलगा/मुलीला हिरव्‍या पालेभाज्‍या आवडतील. तर मग मिश्रण करण्‍यास सुरूवात करा.

दुग्‍धजन्‍य उत्‍पादने

ब्रेकफास्‍टपूर्वी किंवा रात्रीच्‍या जेवणानंतर गरम दूध पिणे, ब्रेकफास्‍टसाठी लापशी, दुपारच्‍या/रात्रीच्‍या जेवणासोबत दही, पेय म्‍हणून लस्‍सी/ताक असो आपण भारतीयांना दुग्‍धजन्‍य पदार्थ खूप आवडतात. अनेक पर्याय उपलब्‍ध असण्‍यासोबत आपल्‍या आहारामध्‍ये दररोज दुग्‍धजन्‍य उत्‍पादनांचा समावेश असल्‍यामुळे मुलांमध्‍ये दुग्‍धजन्‍य पदार्थांबाबत रूची निर्माण करणे फारसे अवघड नाही. दूध, चीज, दही, ताक यांसारख्‍या दुग्‍धजन्‍य पदार्थांमध्‍ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्‍फरस व इतर पौष्टिक घटक असतात, जे निर्जलीकरण, दात किडणे आणि वयाच्‍या सुरूवातीच्‍या काळामध्‍ये होणा-या आजारांना प्रतिबंध करण्‍यामध्‍ये मदत करतात. मुलांना सामान्‍यत: गरम दुधाचा वास आवडत नाही, पण तुम्‍ही त्‍यामध्‍ये मध किंवा स्‍वीटनर टाकले तर ते आवडीने दूध पितात. याव्‍यतिरिक्‍त दूध व दहीमध्‍ये सहजपणे मिसळू शकणा-या ताज्‍या फळाचा वापर करा. तुमचे मुल दूध पिण्‍याला कंटाळा करत असेल तर तुम्‍ही त्‍वरित चविष्‍ट मिल्‍कशेक्‍स व स्‍मूदीज बनवू शकता. त्‍याच्‍या/तिच्‍या मिल्‍कशेकमध्‍ये बदाम टाका, ज्‍यामुळे ते अधिक आरोग्‍यदायी व पौष्टिक संपन्‍न बनेल.

वयाच्‍या सुरूवातीच्‍या काळापासून या उत्तम सवयी लावल्‍यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये हंगामी ताप/आजारापासून प्रतिबंध करणारी रोगप्रतिकारशक्‍ती निर्माण होण्‍यास मदत होईल. तसेच रोजच्‍या पोषणावर देखरेख ठेवण्‍यासाठी त्‍यांचा ब्रेकफास्‍ट, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण यांचे वेळापत्रक ठरवा.       

Leave a Reply

%d bloggers like this: