उद्योजक प्रतिश शहा आणि ध्वनी कोठारी यांनी भव्य सोहळ्यात बांधली लग्नगाठ

पुणे – अनेक स्वप्न गुंफून लग्नसोहळा पार पडतो. कोणतीही इच्छा अति सामान्यही नाही आणि फार भपकेबाजही नाही अशा पद्धतीने हाऊस ऑफ हिंदचे संस्थापक आणि मालक प्रतिश शहा यांनी या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर ध्वनी कोठारी यांच्याशी लग्नगाठ बांधली. हा लग्नसोहळा आठवडाभर सुरू होता. विवाहपूर्व विधी, संगीत आणि स्वागत समारंभ असे विविध कार्यक्रम पुणे आणि महाबळेश्वर परिसरात पार पडले.

हे दोघे कौटुंबिक संबंधांतून एकमेकांना भेटले आणि त्यांच्यातील उद्योजकतेची ऊर्मी, डिझाइन, कला, प्रवास आणि निसर्गावरील प्रेम अशा अनेक समान धाग्यांनी ते एकमेकांकडे आकर्षित झाले. प्रतिश यांचा हाऊस ऑफ हिंद हा ब्रँड म्हणजे सर्व वयोगटातील भारतीय महिलांना एक नवी ओळख देण्याचा प्रयत्न आहे. भारतात आणि परदेशात या ब्रँडचे पारंपरिक ते आधुनिक आणि त्या दरम्यानच्या प्रत्येक प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. अॅवां ज्वेलरी हा ब्रँड ध्वनी यांनी सुरू केला. अत्यंत अनोख्या अशा कॉश्च्युम ज्वेलरीच्या माध्यमातून हा ब्रँड कला आणि कलेचे विविध प्रकार वापरून त्यातील सौंदर्य मांडू पाहतं. हे दोघे एकमेकांना भेटल्यावर अगदी लगेचच एकमेकांकडे आकर्षित झाले… एक पॉवर कपल!

प्रतिश आणि ध्वनी यांच्या बिग फॅट इंडियन वेडिंगसाठी रायटर्स ब्लॉकच्या किंजल वोरा आणि Naeyeni डिझाइन स्टुडिओच्या नैनी शहा यांनी या दोघांसोबत सखोल चर्चा करून, दोघांच्या मुलाखती घेऊन लग्नासाठी अत्यंत सुंदर संकल्पना आणि #RandomButBeautiful हा हॅगटॅग तयार केला. अत्यंत खास बंध अत्यंत सहज मात्र सुंदर पद्धतीने तयार होतात आणि निसर्ग जसा सहज पण सुंदर असतो तसंच प्रतिश आणि ध्वनी यांच्यातील प्रेम सहजसुंदर आहे.

या लोगोमध्येही विविध प्रकारच्या डिझाइन्सचा वापर करण्यात आला आहे. त्यांच्यातील समान धागे असलेल्या, त्यांचा वारसा पुढे चालवण्यात सहभाग असलेल्या सहज मात्र सुंदर अशा गोष्टींचा यात समावेश आहे. स्पिक्स मॅकॉज, जंगली फुलांवरील या दोघांचे प्रेम, त्या दोघांचे आवडते जांभळा आणि पिवळा हे रंग… या सगळ्यातून प्रतिश आणि ध्वनीची ओळख दिसते आणि त्यांच्यातील अनोखे बंधही.

या दोघांच्या आऊटफिटने तर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या जोडप्याच्या आवडीनिवडीनुसार अत्यंत चोखंदळपणे तयार केलेल्या लग्नाच्या कपड्यांमध्ये या क्षेत्रातील काही अत्यंत प्रसिद्ध डिझायनर्स आणि ब्रँड्सचा वाटा होता. गौरव गुप्ता ते अबु जानी संदीप खोसला, कुणाल रावल ते एसव्हीए बाय सोनम अॅण्ड पारस मोदी, अमित अग्रवाल ते अनुश्री रेड्डी, ट्रॉय कोस्टा ते रूपकला आणि एव्हाडोर… लग्नसराईच्या या खास कपड्यांना अगदी चोखंदळपणे तयार करण्यात आले होते आणि तेही फक्त 45 दिवसांच्या कालावधीत.

ड्रीमक्राफ्टझ-वेडिंग डेकोरेटर्स अँड प्लनर्स या आघाडीच्या वेडिंग डेकोरेटर्स आणि प्लनर्सनी विविध प्रकारच्या 11 कार्यक्रमांचे आयोजन करून हा लग्नसोहळा संस्मरणीय बनवला. सौंदर्य लहानसहान बाबींमधून दिसते आणि ड्रीमक्राफ्ट्झने ही परीकथा जीवंत करण्यासाठी अहोरात्र काम करून फारच अनोख्या आणि अप्रतिम पद्धतीने सारे काही उभे केले.

16-25 जानेवारी 2021 या आठवडाभराच्या काळात विविध प्रकारच्या अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाबळेश्वरमधील अप्रतिम सोहळ्यांपूर्वी पुण्यात हा आनंदाचा खेळ रंगला. 16 जानेवारी 2021 रोजी साखरपुड्याने या सोहळ्याची सुरुवात झाली. जेडब्ल्यू मॅरिएट पुण्याच्या बॉलरूममध्ये दोन्हीकडील पाहुण्यांनी ही रात्र संस्मरणीय केली. यावेळी बोहेमिअन आणि अर्थी संकल्पनेतील सजावट करण्यात आली होती. या सुंदर सोहळ्यानंतर या हॉटेलमधील मिआमी या नाइटक्लबमध्ये आफ्टरपार्टी ठेवण्यात आली होती. डीजे नावेद आणि अभिषेक अहिर यांनी या पार्टीचा एकेक क्षण जागवला.

दुसऱ्या दिवशी मुलीकडे रंडाल माता पुजा आणि मेहंदीचा कार्यक्रम होता. यासाठी पुण्यातील लँडमार्क गार्डन क्लब हाऊसला जणू मखमलीच्या फुलांची बाग बनवण्यात आलं होतं. इथे जमलेल्या पाहुण्यांना बिंदू चेतन यांनी गुजराती गाण्यांनी खुश केले. लग्नाच्या या खास गाण्यांनी ही दुपार अगदी संस्मरणीय झाली.

तर 23 तारखेला मुलाकडे मेहंदीचा कार्यक्रम होता. पुण्यात लिटील इटली येथे मोकळया आकाशाखाली हा सोहळा रंगला. ढोल वाजवणारे आणि स्थानिक पुणे डीजे पियुष मेहता यांनी संपूर्ण कार्यक्रम संगीतमय केला. मात्र, या सोहळ्यातील सगळ्यात खास बाब म्हणजे वराने सेगवेवरून केलेली एंट्री.

24 तारखेला सगळेच महाबळेश्वरमधील ब्राइटलँड रीसॉर्ट अॅण्ड स्पाच्या दिशेने निघाले. संपूर्ण मेन लॉन्स झगमगत होता आणि स्टेजवर सोनम पुरी बँड यांच्या अप्रतिम परफॉर्मन्सने सगळेच आनंदित झाले. त्यानंतर या रीसॉर्टमधील इलेक्ट्रिक मिस्ट लाऊंजमध्ये आफ्टर पार्टी झाली. डीजे जमिन या पुण्यातील स्थानिक डीजेने रात्रभर सगळ्यांना थिरकायला लावले.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता बारात निघाली. मंडपाच्या दिशेने देखण्या विंटेज कारमधून निघालेल्या वराचे स्वागत करण्यासाठी मुलाकडील सगळे रंगीबेरंगी सोफ्यांवर वाट पाहत होतो. मात्र, गुरदीप मेहंदी यांनी या कार्यक्रमाचा ताबा घेतला आणि सगळ्यांच्या उत्साहाला उधाण येत वरात जणू एका पार्टीमध्ये बदलली. 12.57 ला लग्नाच्या विधी सुरू झाल्या. स्वप्नील मिस्त्री आणि बँडने सगळ्यांचं मनोरंजन केलं आणि त्याचवेळी प्रतिश आणि ध्वनी यांचे नाते पती-पत्नीच्या नात्यात बदलले. त्याच संध्याकाळी पूलसाइडला स्वागत समारंभ पार पडला. यासाठी पूलसाइडची जागा निळ्या फुलांच्या कमानी आणि शँडेलिअर्स लावून इटालियन रिव्हीएरामध्ये बदलण्यात आली होती. या आनंदाने भारावलेल्या वधू-वरांच्या आयांनी आपल्या मुलांसाठी टोस्टही दिला.

इलेक्ट्रिक मिस्ट लाऊंजमध्ये अप्रितम अॅथलीझर आफ्टरपार्टीने या सोहळ्याची सांगता झाली. ऑल-स्टार डीजे एजेने प्रत्येकासाठी संस्मरणीय ठरेल अशा प्रकारे संगीतरचना केली होती.

मोनिषा आणि द फोटो डायरीची त्यांची टीम यांच्यावर फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीची किमया साधण्याची जबाबदारी होती. प्रत्येक कार्यक्रमाचं ऑनलाइन स्ट्रीमिंग उपलब्ध होतं. त्यामुळे सध्याच्या संकटकाळात ज्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही त्यांनाही आनंद घेता आला. वरमुलाचे कौटुंबिक संबंध असलेल्या भूमिका सेठ यांनी हॉस्पटॅलिटी क्षेत्रातील आपल्या व्यापक अनुभवाच्या आधारे अप्रतिम आणि तज्ज्ञ टीमच्या साह्याने हा लग्न सोहळा अॅवां गार्द आणि भव्य करण्याचे शिवधनुष्य उचलले.

या बहुचर्चित लग्नसोहळ्यात अशा अनेक गोष्टी होत्या. कार्यक्रम ते विविध स्थळे, सजावट आणि खाद्यपदार्थ, मनोरंजन ते संगीत कलाकार…. या #RandomButBeautiful लग्नसोहळ्यात प्रत्येक क्षण संस्मरणीय झाला.

Leave a Reply

%d bloggers like this: