छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त येरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त येरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सफाई कर्मचार्यांचा सन्मान ,रक्तदान शिबीर तसेच सीसीटीव्ही कॅमेरे उद्घाटन असे विधायक उपक्रम यानिमित्ताने राबवण्यात आले.

संकल्प युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती व पाचव्या वर्धापनदिनानिमित्त सफाई कर्मचार्यांचा सन्मान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड ,शैलेश राजगुरू,मनोज शेट्टी , राहुल जाधव, राम बांगड राहुल हजारे, मनोज ठोकळ उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक आकाश पंडित, सौरव गवळी यांनी केले होते.

हरीगंगा सोसायटी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोसायटीच्या आवारात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणेचे उद्घाटन पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव,प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष संजय भोसले,वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख,सामाजिक कार्यकर्ते मंगेश गोळे उपस्थित होते.सोसायटीचे अध्यक्ष शेखर बोंगीर,सचिव कपिल पांडे, संचालक विजय फाळके यांनी मान्यवरांचे स्वागत केले.सूत्रसंचालन व आभार संजय पोळ यांनी केले .

Leave a Reply

%d bloggers like this: