छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन, ‘साखर वाटून’ जल्लोषात शिवजयंती साजरी

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा संरक्षण केला शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही सुद्धा सद्गुरु ला हात लावू दिला नाही शेतकऱ्याला साडेतीनशे वर्षांपूर्वी पेन्शन सुरू करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत होता अशा महान रयतेच्या राजाची जयंती आपण राष्ट्रीय सणासारखी देशभर (शिवजयंती) उत्सव साजरा केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे कार्य-कर्तृत्व प्रत्येक घराघरात पोहोचलं पाहिजे… म्हणून ‘घराघरात शिवजयंती साजरी झाली पाहिजे’ संकल्प करण्यात येत आहे. आपण जाती आणि धर्माच्या उतरंडी बाजूला ठेवून सर्व धर्म समभावाचे प्रतीक व धर्मनिरपेक्ष राजा म्हणजे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे… असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंती निमित्त घरा-घरात ‘शिवजयंती’ साजरी झाली पाहिजे..’ असा संकल्प प्रत्येक शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे. घरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ‘दीपोत्सव’ साजरा करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेड’चे संतोष शिंदे, योग शिक्षक सुनील भालेराव, शालिनी शिंदे, सोनाली जगताप, शोभा नलावडे, कविता ढेणे, अलका काळे, अशोक वाळुंजकर आदी उपस्थित होते. शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे नियोजन शालिनी शिंदे यांनी केले तर आभार सोनाली जगताप यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: