समाजातील विषमता कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे – उल्हास पवार

पुणे, दि. २० –  जाती-अंत समाज डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर यांनी सांगितला. जातीअंताऐवजी, जातिनिष्ठ असा प्रखर समाज निर्माण होताना दिसत आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या वाटचालीमध्ये सामाजिक विषमता कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे, असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले.     

पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या 74 व्या जयंतीनिमित्त दलित पॅंथर तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दलित पॅंथरच्या राष्ट्रीय अध्यक्षा मल्लिका ढसाळ यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले. यात माता रमाई पँथररत्न पुरस्काराने अनिता भोसले आणि ऍड. लक्ष्मी शंकर माने, उल्लेखनीय कार्य आणि सामाजिक गौरव पुरस्काराने प्रमोद आडकर, विठ्ठल गायकवाड, स्नेहा गायकवाड, संतोष ओव्हाळ, अक्षय मुंडे, ईश्र्वर धंग्रेकर, तर सुनील आंग्रे यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अक्कलकोट येथील दलित पॅंथरच्या चाळीस ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान करण्यात आला. मलिका नामदेव ढसाळ यांच्या ‘भीषण गर्भ हवा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन नीलीमा बंडेलू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुनील कांबळे, प्रा. विलास आढाव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम, केंद्रीय कोषाध्यक्ष श्रीकांत लोणारे, संतोष गायकवाड, दीपक म्हस्के,  आदी उपस्थित होते.          

यावेळी यशवंत नडगम म्हणाले, पद्मश्री नामदेव ढसाळ यांची 74 वी जयंती साजरी करीत आहोत याचा आम्हा करून कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद आहे. ढसाळांचा विचार पुढे घेऊन जाणे ही आम्हा पँथर कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. सद्यस्थितीत शेतकरी आंदोलन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफी, वाढीव वीज बिल अशा संवेदनशील विषयावर लवकरच जन आंदोलन छेडणार असल्याचे नडगम यांनी सांगितले.  

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनाली दुनघव, सनी पंजाबी, विशाल ओहाळ, अजय वंदगल, मुद्दसर शेख, किरण ठोंगे, जॅकसन पानेर, ओकार नडगम, प्रिन्स कांबळे, संजय कांबळे, विपीन नायर, रुपेश जगताप, लहू लांडगे, महेश वाघमारे, अमोल पाटोळे, राजेश पोल, आदित्य माने, उमेश पवार, सुरेश पवार, लखन कांबले, लालचंद नडगम, गणेश थोरात, नितिन पवार, मच्छिंद्र पवार, गुरुनाथ गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी, तर आभार यशवंत नडगम यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: