पुणे पीपल्स बँकेच्या बाणेर शाखेचे नव्या वास्तुत स्थलांतरण

पुणे, दि. १९ – पुणे पीपल्स को-आॅप बँक लि., पुणे च्या बाणेर शाखेच्या सुसज्ज जागेतील स्थलांतरणाचा कार्यक्रम फ्युचर – १, स.नं. २४५/४/२ आणि २४५/५/१, अपार्टमेंट कंडोमिनियम, मेडीपॉईंट हॉस्पिटलजवळ, बाणेर, पुणे येथे उत्साहात पार पडला. नवीन शाखा भवनाचे उद््घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि ज्येष्ठ उद्योगपती नानासाहेब गायकवाड यांच्या हस्ते झाले. 

कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे, उपाध्यक्ष डॉ.रमेश सोनवणे, सरव्यवस्थापक सदानंद दिक्षीत, संचालक अ‍ॅड.सुभाष मोहिते, विजयकांत कोठारी, बबनराव भेगडे, सुभाष नडे, श्रीधर गायकवाड, बिपीनकुमार शहा, सुभाष गांधी, दिलीप दगडे, संजय गुगळे, अंबर चिंचवडे, रमेश वाघ, सुधीर लडकत आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या, पुणे पीपल्स बँक ही प्रत्येक ग्राहक विश्वासाने जोडला जावा, याकरीता काम करीत आहे. बँकेच्या संचालकांपासून ते शिपाई पदावर काम करणारी प्रत्येक व्यक्ती नम्रतेने सेवा देत असल्याने बँकेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

सीए जर्नादन रणदिवे म्हणाले, पुणे पीपल्स बँकेच्या २३ शाखा, १ मुख्य कार्यालय ग्राहकांच्या सेवेत असून २००० कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. कोरोना काळात देखील बँकेने १०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. एकूण १३ वर्षे बँकेने अ दर्जा मिळविला आहे.  ग्राहकांना अधिक सुखद वातावरणात स्नेहपूर्ण सेवा देता यावी, यासाठी बाणेर शाखा नवीन, प्रशस्त आणि सर्वसोयींनी युक्त अशा जागेत स्थलांतरीत करीत आहोत. नवीन जागेत एटीएम, सुरक्षा कक्ष आदींसह अनेक अत्याधुनिक सुविधा देखील उपलब्ध आहेत. 

अ‍ॅड.सुभाष मोहिते म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांच्या जवळ जाणारे सहकार क्षेत्र आहे. पुणे पीपल्स बँक देखील हे तत्व अंगिकारुन कार्य करीत आहे. अनेकांच्या सलग चार पिढ्या बँकेशी संलग्न आहेत. त्यामुळे जुन्या खातेदारांशी बांधिलकी आणि नव्या पिढीला देखील बँकेशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे अत्याधुनिक सर्व सुविधा आम्ही बँकेच्या प्रत्येक शाखेत देत आहोत, असेही त्यांनी सांगितले. नानासाहेब गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. सदानंद दिक्षीत यांनी सूत्रसंचालन केले. बबनराव भेगडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: