जेएससी एज्युकेशनल ट्रस्ट च्या फॉरेन लँग्वेज स्टुडिओ, लाईफ स्कील प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

पुणे, दि. १४ – जेएससी एज्युकेशनल ट्रस्टच्या फॉरेन लँग्वेज स्टुडिओ, लाईफ स्कील प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मनसे विधी विभागाचे प्रदेश सरचिटणीस अॅड.किशोर शिंदे,महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाले.

यावेळी डॉ. स्नेहा जोगळेकर लिखित ‘द बस आय मिस्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन, ट्रस्टच्या संकेतस्थळाचा प्रारंभ झाला..ट्रस्टच्या संस्थापक डॉ. स्नेहा जोगळेकर यांनी स्वागत केले.

वनाझ कॉर्नर जवळील ट्रस्टच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

ट्रस्टचे विश्वस्त वर्षा पराडकर, वरुण जोगळेकर, निष्का जोगळेकर,ओम कुंभार, अतुल पराडकर यावेळी उपस्थित होते.

या केंद्रात स्पोकन जर्मन, जपानी, चिनी या परकीय भाषा शिकवल्या जाणार आहेत. स्पोकन इंग्लीश, संस्कृत भाषा देखील  शिकवल्या जाणार आहेत.व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. परदेशात शिक्षणासाठी जाताना द्याव्या लागणाऱ्या परीक्षा तसेच रोजगारसंधीची माहिती दिली जाणार आहे.

किशोर शिंदे म्हणाले, ‘ परकिय भाषा प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. त्यातून रोजगार संधी निर्माण होतील. युवकांच्या मनातील न्यूनगंड काढला तर प्रगतीची दारे उघडतील. अतुल कुंभार यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

%d bloggers like this: