‘शिवजयंती’च्या कार्यक्रमाच्या बंदी मागे शिवसेनेच्या डोक्यातील तारीख-तिथीच्या वादाचा किडा वळवळ करतोय…!!

शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय कार्यक्रम मुंबईत घेतला. सर्वपक्षीय नेत्यांसह हजारोंच्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात धर्मांध भाषण करणं जातीय तेढ निर्माण करणं यापेक्षा वेगळं काही केलेलं नव्हतं. तरीही पक्षीय राजकारण जोपासण्यासाठी त्यांच्या कार्याचा उदो-उदो होतो. महापुरुषांच्या यादीत त्यांचा समावेश होण्याचं काही कारण नाही तरीही समावेश झाला. खरंतर महापुरुषांच्या यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा समावेश व्हायला पाहिजे होता. तरीही सगळे शांत बसले. आज पर्यंत शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद शिवसेनेने घातला. आत्तासुद्धा १९ तारखेला शिवजयंती असताना जाणीवपूर्वक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना अर्थात (Covide-19) कारण पुढे करून जर कार्यक्रमावर बंदी घालणार असतील तर हा करंटेपणा उद्धव ठाकरे करत आहे. हा शिवद्रोही मुख्यमंत्री महाराष्ट्राला चालणार नाही… आम्ही दोन शिवजयंती होऊ देणार नाही.

मा. नाना पटोले महाराष्ट्रात ट्रॅक्टर मोर्चा काढतात, हजारो लोकांची मुंबईत सभा घेतात, राष्ट्रवादीचे जयंत पाटील संवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर लोकांमध्ये बोंबलत फिरतात… पदवीधर आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये हजारोच्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आले मग शिवजयंतीला परवानगी का नाही…? कारण महाविकास आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र मिळून ‘शिवजयंती’ वर बंदी घालण्याचा आणि तिथीचा पुरस्कार करण्याचा छूपा अजेंडा राबवत आहे. शिवप्रेमी ते खपवून घेणार नाहीत.

संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात, शहरात आणि जिल्ह्यात धुमधडाक्यात शिवजयंती चे कार्यक्रम साजरे करणार…! सरकारला काय गुन्हे दाखल करायचे आहेत ते त्याने करावे. मात्र शिवाजी महाराजांच्या अस्मिता आहे. शिवरायांचा जय जय कार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सरकारने ‘बंदी’चा फतवा (आध्यादेश) तात्काळ पाठीमागे घ्यावा… अशी संभाजी ब्रिगेड ची मागणी आहे.

‘शिवजयंती’च्या कार्यक्रमावर बंदी घालणाऱ्या महाराष्ट्रातील औरंगजेबी ‘शिवद्रोही’ सरकारचा धिक्कार असो…

छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी आहे. महाराष्ट्रात लाखो शिवप्रेमी सरकारचे सर्व नियम पाळून धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन पूर्ण केलेले आहे. मात्र कोरोना (Covide-19) चे कारण देऊन सरकारने यावर्षी गर्दीचे कारण देऊन ‘शिवजयंती’ कार्यक्रम रद्द करण्यात निर्णय घेतला असून तसा औरंगजेबी ‘फतवा’ सरकारने काढला आहे. या फतव्याचा व ठाकरे सरकारच्या निर्णयाचा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने सर्वप्रथम जाहीर निषेध…

सरकारने काढलेला फतवा तात्काळ पाठीमागे घेऊन शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सरसगट परवानगी द्यावी… वेळ पडली तर ‘मिरवणूका रद्द करा, मात्र कार्यक्रम झाले पाहिजेत…’ अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. सरकारने काढलेल्या या फतव्यात विरोधात महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमी प्रचंड संतापलेला आहे. म्हणून सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून तात्काळ बंदी उठून परवानगी द्यावी… असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी आज व्यक्त केले.

तीन पक्षाच्या ठाकरे सरकार मधील नेत्यांनो…
जर ‘शिवजयंती’ वर बंदी घालायची असेल तर… राष्ट्रवादीची संवाद, त्याच बरोबर तुमच्या सर्व पक्षांचे उद्घाटन, मेळावे, रॅली व संवाद यात्रा तात्काळ रद्द करा…

शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद घालणाऱ्या शिवजयंती चे महत्व काय कळणार…! गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंती चे कार्यक्रम अतिशय दिमागात, चांगल्या पद्धतीने घेणाऱ्या शिवप्रेमींच्या मनाच्या विरोधात जर हे सरकार जाणार असेल किंवा वाद निर्माण करण्याचा, यांची जर नियत असेल तर हे सरकार शिवद्रोही आहे हे यांच्या निर्णयावरून स्पष्ट होते. सरकारने तात्काळ निर्णय मागे घ्यावा अशी महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमी ची इच्छा आहे.

सरकारने शिवद्रोही अथवा तात्काळ पाठीमागे घ्यावा व सरसकट परवानगी द्यावी…

‘शिवजयंती’ हा आमचा राष्ट्रीय सण आहे. आम्ही धुमधडाक्यात साजरा करणार… तुमचे पुतळा उद्घाटन, मेळावे, संवाद यात्रा चालते मग आमची व्याख्यानमाला, मिरवणूक व दीपोत्सव का चालणार नाही… शिवद्रोही कुठले…!

  • संतोष शिंदे, पुणे.
    प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र
    985084270 https://youtu.be/lRs5mV-c8TU

Leave a Reply

%d bloggers like this: