पोस्ट अ‍ँड टेलिकॉम सोसायटीच्या विशेष कव्हरचे अनावरण

पुणे, दि. १३ – दि पुणे पोस्ट अ‍ँड टेलिकॉम को. आॅप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड  च्यावतीने शतकमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कव्हरचे अनावरण करण्यात आले. संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त जनरल पोस्ट आॅफिस पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल कर्नल एस. एफ. एच. रिझवी, पुणे विभागाच्या डायरेक्टर पोस्टर सर्व्हिसेस सिमरन कौर, पुणे पोस्ट्स अ‍ॅण्ड टेलिकॉम को.आॅप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे चेअरमन दीपक धुमाळ, उपाध्यक्ष भानुदास कोलते, चिटणीस उमाकांत वालगुडे, व्यवस्थापक राजन कामठे आदी यावेळी उपस्थित होते.
एस. एफ. एच. रिझवी म्हणाले, कोणत्याही संस्थेसाठी १०० वर्षे पूर्ण होणे हे त्या संस्थेच्या यशस्वीतेचे चिन्ह आहे. यावरूनच  त्या संस्थेची समाजाला किती गरज आहे हे दिसून येते. दि पुणे पोस्ट अ‍ॅण्ड टेलिकॉम सोसायटीने १०० वर्षे लोकांमधील विश्वास कायम ठेवला. यापुढेही सोसायटीने असेच काम करून लोकांच्या गरजा पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सिमरन कौर म्हणाल्या, इंग्रजांच्या काळात  सुरू झालेल्या या संस्थेचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सामाजिक जबाबदारी देखील संस्था चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. आज संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या विशेष कव्हरचे अनावरण ही भारतीय डाकघरासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे.
दीपक धुमाळ म्हणाले, दि पुणे पोस्ट अ‍ँड टेलिकॉम को आॅप  सोसायटीने तब्बल १०० वर्षांचा टप्पा यशस्वीपणे पार करीत शतक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  कर्करोगग्रस्त रुग्णांना मदत,  १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांचा सन्मान, रक्तदान शिबीर  यांसारखे विविध उपक्रम सोसायटीमार्फत राबविण्यात येत आहेत. तसेच मुलींसाठी विविध योजना सोसायटीने राबविल्या आहेत. 

Leave a Reply

%d bloggers like this: