छबीलदास ट्रस्ट तर्फे गुणवंतांचा सत्कार

पुणे, दि. ७ – छबीलदास ट्रस्ट, समस्त गुजराती महाजन संस्था, सिध्दमाता मंदिर, महाजन महिला मंडळ यांच्या तर्फे शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.१५ विद्यार्थ्यांना आणि गुणवंतांना एकूण एक लाख रुपयांची रोख पारितोषिके छबीलदास ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. अॅड. सुप्रिया कोठारी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. छाबीलदास ट्रस्ट चे अध्यक्ष जे.के. सराफ हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.

डॉ. संजयकुमार शाह, अॅड. तेजल आहेर यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शैक्षणिक यशाबद्दल शुभम भारतिय, स्मृती गुजराती,रुची मेरवाना, कुणाल मेहता, रोहित गुजराती, भाव्या वाणी, श्रुती शाह यांचा सत्कार करण्यात आला. अपूर्व शाह, अथर्व लाड, ध्रुव गुजराती, हिमानी तलाठी, यक्षदा डिसा, निकुंज शहा, योगेश शाह यांचा सामाजिक योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. बालेशभाई शहा , कुमार आहेर यांनी सूत्रसंचालन केले.

शनीवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. रमेश ठेकडी, स्मृती गुजराती, नीलेश गुजराती, अंशुल गुजराती यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: