हिंदवेअरकडून थाॅटफुल इज ब्युटिफुल या नव्या मोहिमेची सुरवात

पुणे – आघाडीचा बाथवेअर ब्रँड असलेल्या हिंदवेअरने नवीन वर्षाची सुरवात थाॅटफुल इज ब्युटिफुल या नव्या मोहिमेने केली आहे. या क्षेत्रात अशाप्रकारची मोहीम प्रथमच राबविण्यात येत आहे. नावीन्यतापूर्ण कार्यक्षम उत्पादनाद्वारे ग्राहकांना सोयी पुरविण्यातच खरे सौंदर्य लपलेले आहे असा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात आला आहे. 

थाॅटफुल इज ब्युटीफुल या चित्रफितीद्वारे सुंदर बाथरूमवर लक्ष केंद्रित करणाऱ्या जाहिराती या मोहिमेद्वारे प्रक्षेपित करण्यात येत आहेत. मॅजिकसर्कल कम्युनिकेशन्सची ही संकल्पना आहे. बाथवेअर या क्षेत्रामध्ये प्रथमच अशाप्रकारे मोहीम राबविण्यात येत आहे. ग्राहकांना किमान सौंदर्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाधारित नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात दाखल करण्याची कंपनीची क्षमता या चित्रफितीतील संवादाद्वारे लोकांपर्यंत पोचत आहे. 

फिंगरप्रिंट फिल्म निर्मित आणि करण शेट्टी दिग्दर्शित या जाहिरातींमध्ये एका मिलेनिअल तरुण जोडप्यामधील खेळीमेळीच्या वातावरणातील व नात्यातील चढाओढ दाखविण्यात आली आहे. त्या दांपत्यामध्ये होत असलेल्या बाथरूमशी संबंधित थाॅटफुल इज ब्युटीफुल या विवादामध्ये नणंद ही नकळतपणे ओढली जाते असे या लाँच फिल्ममध्ये दाखविण्यात आले आहे आणि त्यातूनच हे दर्शविण्यात आले आहे की हा निर्णय घेणे तितके सोपे नसते. त्या दांपत्यातील मस्तीपूर्ण संवाद आणि खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांना डिवचणे हे मोहिमेच्या पुढील टप्प्यात फाॅलो-अप फिल्ममध्ये दिसणार आहे. त्यातून उत्पादनाची वैशिष्ट्य आणि थाॅटफुल विरुद्ध ब्युटिफुल ही चर्चा पुन्हा केंद्रस्थानी आणली जाणार आहे. 

हिंदवेअर ब्रँडने पारंपरिक तसेच नवीन युगातील संसाधनांचा वापर करून सखोल संशोधन केले. बाजारपेठेतील सध्या उपलब्ध असलेली उत्पादने आणि ग्राहकांच्या गरजा यातील तफावत ओळखून व जाणून घेत उत्पादनाची नावीन्यपूर्ण पद्धतीने रचना, मांडणी व सादरीकरण केले आहे. ग्राहकांचे दैनंदिन आयुष्य सुलभ करण्यासाठी विविध उत्पादने आणि पर्याय देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न कंपनीद्वारे करण्यात येत आहे. थाॅटफुल इज ब्युटिफुल या मोहिमेतूनही हाच प्रयत्न करण्यात आला आहे. ग्राहकांना परिपूर्ण सोयी-सुविधा देणारा अत्युच्च दर्जाचे आणि विचारपूर्वक तयार केलेले उत्पादन देण्याचा कंपनीचा विचार या मोहिमेद्वारे मांडण्यात आला आहे.

मोहिमेविषयी बोलताना सुधांशू पोखरियाल, चिफ आॅपरेटिंग आॅफिसर, बाथ प्रोडक्ट्स, ब्रिल्लोका लिमिटेड म्हणाले, काळाप्रमाणे उत्पादनाचे सादरीकरण आणि वैशिष्ट्ये बदलून व सुधारून, हिंदवेअर ब्रँडने स्वतःची ओळख विश्वासार्ह आणि उपयुक्त ब्रँड म्हणून तयार केली आहे. ग्राहकांच्या गरजा समजणाऱ्या आणि भारतातील सर्वोत्कृष्ट बाथवेअर उत्पादने सादर करणाऱ्या हिंदवेअर ब्रँडवर ग्राहकांनीही तितकाच विश्वास ठेवला आहे.

चारू मल्होत्रा, उपाध्यक्ष व मार्केटिंग हेड, बाथ प्रोडक्ट्स, ब्रिल्लोका लिमिटेड म्हणाल्या, कंपनीचे हे स्थान बळकट करण्याबरोबरच या क्षेत्रात ग्राहकांसोबत होणाऱ्या संवादाची परिभाषा सौंदर्य आणि सौंदर्यशास्त्राच्या अनुषंगाने सकारात्मक पद्धतीने बदलून टाकण्याचा या नव्या मोहिमेचा उद्देश आहे. नव्या काळातील ग्राहक हे फक्त सुंदर बाथरूम उत्पादने बघत नाहीत तर त्यातून त्याचे आयुष्य सुखकर व सुलभ होण्याच्या दृष्टीने असलेल्या वैशिष्ट्यांनाही त्यांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. हा बदल लक्षात घेऊन हिंदवेअर ब्रँडने थाॅटफुल इज ब्युटीफुल ही संकल्पना राबविली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: