आव्हानात्मक भूमिका साकारायला मला आवडतं – रोशन विचारे

झी युवावरील ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता रोशन विचारे याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्याचा उत्तम अभिनय प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या आधी रोशनने पौराणिक आणि ऐतिहासिक मालिकांमध्ये देखील भूमिका साकारली होती

तुझं माझं जमतंय या मालिकेत शुभंकरची व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना रोशन म्हणाला, “तुझं माझं जमतंय या मालिकेत मी साकारत असलेली शुभंकरची भूमिका खूप इंटरेस्टिंग आहे. शुभंकर हा खूप चार्मिंग, हँडसम आणि सर्वगुण संपन्न मुलगा आहे. प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा डोळ्यात कैद करणारी त्याची नजर आहे. तुझं माझं जमतंय हि मालिका अश्विनी आणि शुभंकर यांच्या प्रेमकथेबद्दल आहे. मी माझ्या कॉलेजपासून थिएटर करतोय. त्यामुळे टीव्ही माध्यमात पदार्पण करण्यासाठी मी एका उत्तम संधीची वाट पाहत होतो. मी जेव्हा पौराणिक मालिकेत एक भूमिका केली तेव्हा मला तशाच प्रकारच्या भूमिका साकारायची ऑफर्स येऊ लागल्या. पण मला एकाच प्रकारचं काम कधीच करायचं नव्हतं. त्यानंतर एका ऐतिहासिक मालिकेत एक भूमिका केल्यानंतर मला काहीतरी कंटेम्पररी काम करायचं होतं आणि त्याच वेळी मला तुझं माझं जमतंय हि मालिका मिळाली आणि मी ती आनंदाने स्वीकारली.

मला आव्हानात्मक भूमिका साकारायला आवडतं आणि शुभंकर म्हणजेच आजच्या काळातील मुलाची भूमिका साकारायची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद आहे. प्रेक्षकांचं मिळणार प्रेम आणि मालिकेला मिळणारा उत्तम प्रतिसाद हीच आम्हा सर्वांच्या कामाची पावती आहे.”  

Leave a Reply

%d bloggers like this: