अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या ज्ञानश्री फाउंडेशन सन्मान

पुणे, दि. २९ – सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी अहोरात्र झटून कार्य करणाऱ्या तसेच अनाथ मुलांचे शिक्षण, आरोग्य व भवितव्य घडवण्यासाठी मोलाची कामगिरी केल्या बद्दल स्वरगंधा व ज्ञानश्री
फाउंडेशनचे जोहरभाई चुनावाला, अमर काळे व राजेंद्र दीक्षित यांना मराठवाड्यातील साथ फाउंडेशन व प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून सन्मान केला.

या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर, यशवंत भुजबळ, राजेंद्र दीक्षित धनराज कदम विनिता देशमुख धनराज कदम, मीराताई कदम असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

मीराताई धनराज कदम यांच्या साथ फाउंडेशन मराठवाडा व ज्ञानश्री फाउंडेशन मोलाचे कार्य सध्या सुरू असून शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी ते काम करत आहेत.

या प्रसंगी बोलताना मीराताई म्हणाल्या की मी जिल्हा परिषदेला शिक्षिका म्हणून काम केले असून पोलिओने वयाच्या १८ वर्षी दोन्ही पाय गमावले. मात्र मी अपंगावर मात करत जिद्दीने जीवनाचा प्रवास केला आहे. सेवासदन वसतिगृह हिंगोली येथे आई वडील छत्र हरवलेल्या ४० मुलांचा मी सांभाळ करते. गायिका राधा मंगेशकर म्हणाल्या की ज्ञानश्री फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. या कार्याला शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्ञानश्री फाउंडेशन तर्फे संगीत रजनी कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: