लीला पुनावाला फाउंडेशनतर्फे ‘मेरिट-कम-नीड’ आधारित अंडरग्रॅजुएशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची संधी

अभियांत्रिकी, नर्सिंग आणि फार्मर्सीच्या मुलींसाठी मोठी संधी.

पुणे- लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) आर्थिकदृष्या वंचित पार्श्वभूमी असणार्या आणि शैक्षणिक दृष्ट्या उज्ज्वल मुलींच्या निशुल्क शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची संधी घेऊन आले आहे. इच्छुकांना अर्ज करण्याचे आव्हान  फाउंडेशन   कडून करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयात २०२०-२०१२ मध्ये प्रथम शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या मुली यासाठी अर्ज करू शकतात.

खाली दिलेल्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुली अर्ज करण्यास पात्र आहेत. गेल्या २५ वर्षांपासून, एलपीएफने पुणे, वर्धा, अमरावती जिल्हा आणि नागपूर शहरातील ९३०० पेक्षा जास्त मुलींना शिष्यवृत्ती दिली आहे. बी.ई. / बीटेक १२ वी नंतर किंवा डिप्लोमा नंतर, बीएस्सी मध्ये नर्सिंग आणि बी फार्मसी.या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. तपशीलवार पात्रतेच्या निकष आणि अर्जासाठी लिंकवर क्लिक करा –  www.lpfscholarship.com      किंवा वेबसाइट:  www.lilapoonawallafoundation.com     त्वरा करा! ही सुवर्णसंधी गमावू नका! फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह तत्वावर मर्यादित ऑनलाइन फॉर्म उपलब्ध आहेत. अर्जांची अंतिम तारीखः अभियांत्रिकी (बी.ई.) / बी.टेक – मंगळवार, २ फेब्रुवारी २०२१, इंजीनियरिंग डिप्लोमा नंतर – रविवार ७ फेब्रुवारी २०२१ बी. फार्मसी आणि बीएस्सी नर्सिंग – रविवार १४ फेब्रुवारी २०२१ अधिक माहितीसाठी कृपया अस्मिता शिंदे यांना संपर्क साधा. संपर्कासाठी लँडलाईन क्रमांक आहे ०२० – २७२२४२६४ /६५ मोबाइल: ८६६९९९८९८१ / ८६६९९९८९८२ ईमेल: asmita@lilapoonawallafoundaiton.com

Leave a Reply

%d bloggers like this: