मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सांगता
पुणे, दि. २८ – महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी अकादमीतर्फे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सांगता गुरुवारी आझम कॅम्पस येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली.१४ ते २८ जानेवारी दरम्यान हा पंधरवडा विविध स्पर्धा, उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार हे सांगता समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव डॉ.लतीफ मगदूम , प्रा.विजय लोंढे, प्रा.विजय अंधारे , अब्बास शेख, पांडुरंग पवार, अकादमीच्या संचालक नूरजहाँ शेख, सानिया अन्सारी उपस्थित होते.
डॉ. इनामदार म्हणाले, ‘ मराठीवर इंग्रजीचे आक्रमण होत आहे. मराठी चे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.मराठी चांगलं बोलता आलं, की सर्व अडथळे दूर होतात. फर्डे मराठी बोलता येणे, हे चांगल्या संवादासाठी आयुष्यात उपयोगी ठरते. प्रमाण मराठी भाषा सर्वांना अवगत व्हावी, राज्यातील शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले पाहिजे.
नूरजहाँ शेख यांनी प्रास्ताविक केले.
दिलशाद शेख यांनी सूत्रसंचालन केले. निलोफर पटेल यांनी आभार मानले.